रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:23 AM2021-05-06T04:23:26+5:302021-05-06T04:23:26+5:30

अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही व्यक्ती स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी कोविड १९ विषाणूच्या आजारावर लागणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करीत असल्याची ...

Three blackmailers of Remedesivir were arrested | रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना केले जेरबंद

रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना केले जेरबंद

Next

अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही व्यक्ती स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी कोविड १९ विषाणूच्या आजारावर लागणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करीत असल्याची माहिती अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना खबऱ्यामार्फत मिळाली. यावरून त्यांनी पोलिसांचे पथकाद्वारे औषध निरीक्षक नामदेेव भालेराव व दोन पंचासह सापळा रचून डमी ग्राहक पाठविले.

यावेळी आण्णासाहेब सुग्रीव किर्दकर (वय २८, रा.चाकाटी लाखेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे), अजय महादेव जाधव (वय २३), कुमार महादेव जाधव (वय २१, दोघे रा. संग्रामनगर) यांनी आपसात संगनमत करून, कोविड १९ या साथीच्या आजाराचे औषध म्हणून वापरण्यात येणारे रेमडेसिविर इंजेक्शन अवैध मार्गाने छापील किमतीपेक्षा ३५ हजार रुपये अधिक दराने, वैद्यकीय अधिकाऱ्याच्या चिठ्ठीशिवाय व कोविड तपासणी अहवालाशिवाय अधिक किमतीने विक्री करण्यासाठी जवळ बाळगून, १०० फुटी बायपास रोडवरील अभय क्लिनिकजवळ विक्री करून शासनाची फसवणूक करताना आढळून आले.

पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेेेऊन औषध निरीक्षक नामदेव भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकलूज पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध २३६/ २०२१ ने भादंविसं कलम ४२०, ३४ सह परिच्छेद २६ औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ सह वाचन कलम ३(२) (सी), जीवनावश्यक वस्तूंचे अधिनियम १९५५ चे उल्लंघन, दंडनीय कलम ७ (१)(ए)(२) तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० चे कलम १८ (सी) चे उल्लंघन दंडनिय २७(बी) (२), १८-ए चे उल्लंघन दंडनीय २८, कलम १८(ए)(२) सह वाचन १७-बी चे उल्लंघन दंडनीय २७ (सी), नियम १०४ चे उल्लंघन दंडनीय २७(डी),कलम २२ (१)(सीसीए) दंडनीय कलम २२ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करून संशयित आरोपींना अटक केली. त्यांना बुधवारी माळशिरस न्यायालयात हजर केेले असता, न्यायालयाने तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेेत.

ही कारवाई पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे व उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वैभव मारकड, पोहेकाॅ सुहास क्षीरसागर, विक्रम घाटगे, मंगेश पवार, रामचंद्र चौधरी, पोना नीलेश काशिद, पोकॉ अमितकुमार यादव यांनी केली आहे.

----

अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणी रेमडेसिविर इंजेक्शनची जास्त पैसे घेऊन विक्री करत असतील, तर नागरिकांनी तत्काळ कळवावे. त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, तसेच आरोपींना अटक करून कडक कारवाई करण्यात येईल.

- अरुण सुगावकर, पोलीस निरीक्षक

Web Title: Three blackmailers of Remedesivir were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.