तीन कोटी पाण्यात, रस्ता गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:16 AM2021-07-02T04:16:13+5:302021-07-02T04:16:13+5:30

सन- २०१९-२० मध्ये राज्य शासनाकडून शिरवळ ते सदलापूर मार्गे सलगरपर्यंत ७ किलोमीटर रस्ता काही दिवसांपूर्वी नव्याने बनविण्यात आला आहे. ...

Three crores of water, carried away the road | तीन कोटी पाण्यात, रस्ता गेला वाहून

तीन कोटी पाण्यात, रस्ता गेला वाहून

Next

सन- २०१९-२० मध्ये राज्य शासनाकडून शिरवळ ते सदलापूर मार्गे सलगरपर्यंत ७ किलोमीटर रस्ता काही दिवसांपूर्वी नव्याने बनविण्यात आला आहे. हा रस्ता कमी कालावधीत ठिकठिकाणी खचला आहे. या रस्त्याची चौकशी व्हावी व कारवाई व्हावी या मागणीसाठी परिसरातील शेकडो युवकांनी तासभर आंदोलन केले.

यावेळी सिकंदर जमादार, मल्लिनाथ पाटील, उमेष निंबाळे, शिवानंद पटणे, महिबूक किणी, शिवानंद मुलगे, प्रदीप भजे, श्रीशैल पाटील शिवराज भोसगी, इंद्र सुतार आदी उपस्थित होते.

----

रस्ता गेला वाहून

हा रस्ता बनवून केवळ एक महिना लोटला आहे. यासाठी तीन कोटी रुपये निधी मंजूर झाले होते. डांबर, ऑईल भेसळ ग्रेड तीनचे वापरले आहे. सदलापूर गावाजवळ रस्ता खराब हाेऊन वाहून गेला आहे, असा आरोप त्याप्रसंगी आंदोलकांनी केला.

---

सदलापूर गावाजवळ काळी माती आहे. रस्त्याच्या बाजूला गटार नसल्याने पाणी रस्त्यावर येऊन ४०० मीटर रस्ता खराब झाला आहे. चार वर्षांपूर्वीचे इस्टिमेट आहे. या रस्त्याचे काम मे. सचिन इंगळे यांनी केले असून, त्यांच्याकडून दुरुस्ती करून घेण्यात येत आहे.

- अजय तेली, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अक्कलकोट.

०१अक्कलकोट-रोड

आंदोलकांनी शिरवळ-सदलापूर रस्त्यावर ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराचा निषेध करीत तासभर आंदोलन केले

Web Title: Three crores of water, carried away the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.