तीन दिवसात ३९३ रुग्ण बरे होऊन परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:22 AM2021-05-13T04:22:24+5:302021-05-13T04:22:24+5:30
शहरात ९७ तर ग्रामीणमध्ये २९३ रुग्ण नव्याने वाढल्याची माहिती प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ढगे यांनी दिली. गेल्या ...
शहरात ९७ तर ग्रामीणमध्ये २९३ रुग्ण नव्याने वाढल्याची माहिती प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ढगे यांनी दिली.
गेल्या तीन दिवसात २ हजार ३३३ जणांच्या रॅपिड व आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत.
शहरात १२२७ तर ग्रामीण भागात १६३८ जणांच्या चाचणी केल्या. बार्शीत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट रुग्णांची संख्या ही जास्त आहे. आता डेडिकेटेड कोविड सेंटर आणि हॉस्पिटलची संख्या देखील वाढली आहे. ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये एचआरसिटी स्कोअर जास्त आढळून येत आहे. तसेच गेल्या काही दिवसात मृत्यूची संख्या वाढत आहे. रुग्णसंख्या घटलेली दिसत असली तरी चाचण्यांचे प्रमाण ही निम्म्याहून कमी झाले आहे. रॅपिड ॲन्टिजन किटचाही तुटवडा आहे. ऑक्सिजनदेखील अद्याप पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याचे दिसून येते.