कोरोनाग्रस्त प्रदेशात प्रवास करुन आलेले तीन डॉक्टर पंढरीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 09:58 PM2020-03-16T21:58:03+5:302020-03-16T21:59:55+5:30

आरोग्य विभागाकडून सुचना; १४ दिवस वैद्यकीय व्यवसाय करण्यास बंदी

Three doctors who had traveled to the coroner area entered Pandhar | कोरोनाग्रस्त प्रदेशात प्रवास करुन आलेले तीन डॉक्टर पंढरीत दाखल

कोरोनाग्रस्त प्रदेशात प्रवास करुन आलेले तीन डॉक्टर पंढरीत दाखल

Next
ठळक मुद्देपंढरपूर शहरातील तीन डॉक्टर काही कारणानिमित्त रशियाला गेले होतेकोरोना बाधित प्रदेशात मागील १४ दिवसाच्या कालावधीत त्यांनी प्रवास केल्याचा इतिहास

पंढरपूर : कोरोना प्रदेशात १४ दिवसांचा प्रवास करुन तीन डॉक्टर पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्या डॉक्टरांना पुढील १४ दिवस वैद्यकीय व्यवसाय करु नका अशा सुचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

शहरातील तीन डॉक्टर काही कारणानिमित्त रशियाला गेले होते. ते देशात परत अल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली आहे. कोरोना बाधित प्रदेशात मागील १४ दिवसाच्या कालावधीत त्यांनी प्रवास केल्याचा इतिहास आहे. त्यांना कोरोना बाधा झाल्याची लक्षणे नाहीत. तरीही त्यांनी तपासणी दिनांकापासून पुढील १४ दिवसापर्यंत कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय व्यवसाय करु नये. तसेच आपणास सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, ताप, न्युमोनिया, काही वेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे असल्यास आपण तत्काळ जवळील शासकीय रुग्णयालयाशी किंवा राज्य नियंत्रण कक्ष एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प कक्षला कळवावे.

१४ दिवस स्वत:च्या घरात अलर्गीकरण करुन राहणे आवश्यक राहील. स्वत:च्या घरात अलर्गीकरुन राहतांना त्यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांनी अलर्गीकरणाबाबत दिलेल्या सुचनांची काटेकोर अंमलबजावणी करणे. त्यांच्यावर बंधनकारक असेले.

केंद्र शासनाच्या अलर्गीकरणासंबंधीच्या सुचनांचे स्वत:च्या घरात अलर्गीकरणासाठी पालन न करणाºया रुग्णांना राज्य शासनाने कार्यान्वित केलेल्या अलर्गीकरण कक्षात भरती करण्यास येईल. अशा सुचना आरोग्य विभागाकडून त्या तीन डॉक्टरांना दिल्या असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळाली आहे. 

Web Title: Three doctors who had traveled to the coroner area entered Pandhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.