तीन ग्रामपंचायतींचा तिढा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:16 AM2020-12-27T04:16:49+5:302020-12-27T04:16:49+5:30
तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये अकलूज, महाळूंग व नातेपुते या तीन ग्रामपंचायतींमध्ये सध्या संभ्रमावस्था आहे. निवडणुकीविषयी या गावांमध्ये ग्रामस्थांमध्ये फारशी उत्सुकता ...
तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये अकलूज, महाळूंग व नातेपुते या तीन ग्रामपंचायतींमध्ये सध्या संभ्रमावस्था आहे. निवडणुकीविषयी या गावांमध्ये ग्रामस्थांमध्ये फारशी उत्सुकता दिसत नाही; मात्र यामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय महाळुंग ग्रामस्थांनी जाहीर केला आहे. तर अकलूज व नातेपुते ग्रामस्थांच्या बैठका सुरू आहेत; मात्र लोकशाही प्रक्रियेमध्ये सर्वसमावेशक निर्णयाला ग्रामस्थांनी सहमती दिली. तरच सध्या या प्रक्रियेतून या तीन गावांची राजकीय दिशा स्पष्ट होणार आहे.
ग्रामस्थ ठरणार निर्णायक
गावांची प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून थांबलेली नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले तरीही आयोगाकडून कधीही स्थगिती देऊ शकते. शिवाय निवडणुका पूर्ण झाल्या तरीही नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर ग्रामपंचायत विसर्जित केली जाते. त्यामुळे या प्रक्रियेत सहभाग घ्यावा अथवा नको, याबाबत ग्रामस्थ समन्वयाचा मार्ग काढताना दिसत आहेत. या तीन गावामधील तरुण, वयोवृद्ध व राजकीय मंडळींचा वैचारिक एकोपा सध्यातरी या प्रक्रियेत निर्णायक ठरणार आहे.
----