सोलापूर जिल्ह्यात वादळाचे तीन बळी
By admin | Published: May 7, 2014 09:49 PM2014-05-07T21:49:39+5:302014-05-08T10:36:02+5:30
सोलापूर जिल्ह्यात वादळाने तिघा जणांचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर काही भागांमध्ये घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सोलापूर: जिल्ह्यात या महिन्यात कहरच केला आहे. दररोज कुठे ना कुठे वादळासह पाऊस होत आहे. पंढरपूर तालुक्यातील बादलकोट येथे नागन्नाथ शिवाजी पांढरे (४६) व पारूबाई गणपत पांढरे (५७) या दोघांचा शेतात काम करत असताना वादळी वार्याने तुटलेल्या वीजेच्या तारा अंगावर पडल्याने धक्का बसून जागीच मृत्यू झाला तर बार्शी तालुक्यात घाणेगाव येथे वीज पडून रामलिंग गणपती बचुटे (वय ६५) यांचा मृत्यू झाला. सांगोला व मंगळवेढा तालुक्यात घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.
सांगोला तालुक्यात बुधवारी दुपारी गौडवाडी-करांडेवाडी येथे वीज कोसळून एक घर आगीच्या भस्मसात पडले. तर डोंगरगाव येथील १५ घरावरील पत्रे उडून पडझड झाली तर जवळ्यातही एका घराची पडझड झाली. रात्री उशीरापर्यंत जिल्ातील ग्रामीण भागात अवकळी पाऊस पडत होता.
गाौडवाडीअंतर्गत करांडेवाडी येथील संगाप्पा तुकाराम सरगर यांच्या राहत्या घरावर वीज कोसळून घरातील संसारपयोगी साहित्य, धान्य, सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम जळून भस्मसात झाले. दुपारी घरी कोणी नसल्याने जिवीतहानी टळली. घरनिकी (ता. मंगळवेढा) गावातीलअनेक जणांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत. मधुकर क्षीरसागर यांचे राहते घर जमीनदोस्त झाले असून त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे.
..
नुकसानग्रस्त घराचा पंचनामा
तहसिलदार श्रीकांत पाटील यांना वादळाची व घर जळाल्याची माहिती मिळताच त्यांनी करांडेवाडी येथे धाव घेतली. सरगर कुटूंबीयाची भेट घेऊन नुकसानीची माहिती घेतली आहे. तलाठ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले.