अमेरिकेच्या ‘ब्रीद इंडिया’कडून ‘मातृभूमी’ला तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:17 AM2021-06-06T04:17:04+5:302021-06-06T04:17:04+5:30
यापूर्वीही मातृभूमीला चार मशिन्स मिळाल्या आहेत. कळंब तालुक्यातील येरमाळा येथील सुपुत्र व अमेरिकेत फ्लोरिडा येथे कृषी शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत ...
यापूर्वीही मातृभूमीला चार मशिन्स मिळाल्या आहेत. कळंब तालुक्यातील येरमाळा येथील सुपुत्र व अमेरिकेत फ्लोरिडा येथे कृषी शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ. बालाजी आगलावे यांच्या माध्यमातून या मशीन आल्या आहेत. या मशीन पोस्ट कोविड रुग्णांसाठी मोफत दिल्या जाणार आहेत.
यावेळी आ. राजेंद्र राऊत, सुभाष पाटील, सिंधूताई आगलावे, सूर्यकांत बेदरे, श्रीपाद पांगारकर, प्रमोद पाटील, मातृभूमीचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, संचालक डॉ. लक्ष्मीकांत काबरा, मीना काबरा, डॉ. अपूर्वा काबरा, अशोक हेड्डा, अजित कुंकुलोळ, मंदार कुलकर्णी, प्रशांत खराडे आदींची उपस्थिती होती.
आ. राजेंद्र राऊत यांनी आपल्या भाषणातून मातृभूमीने सुरू केलेली ऑक्सिजन बँक ही संकल्पना रुग्णांसाठी जीवदान देणारी आहे. या मशिन्समुळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
आपण आपल्या माणसाचे आणि आपल्या देशाचे काहीतरी देणे लागतो. या उदात्त भावनेतून आम्ही या उपक्रमाला सुरुवात केली. यापुढील काळातही ‘ब्रीद इंडिया फंड’च्या माध्यमातून भारतासाठी मदत चालू ठेवणार असल्याचे डॉ. बालाजी आगलावे यांनी अमेरिकेतून बोलताना सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपाद पांगारकर यांनी केले, तर आभार अजित कुंकुलोळ यांनी मानले.
----फोटो
===Photopath===
050621\img-20210604-wa0037.jpg
===Caption===
अमेरिकेतील ब्रीद इंडिया फंडच्या वतीने बार्शीच्या मातृभूमी प्रतिष्ठान ला तीन ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन प्रदान