शेतालगत वाळू का भरता असे विचारल्यावरून डॉक्टरसह तिघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:23 AM2021-04-23T04:23:48+5:302021-04-23T04:23:48+5:30

डॉ. महेशकुमार बाळासाहेब लिगाडे (रा. दत्तनगर-सांगोला), योगेश बाळासाहेब लिगाडे व सचिन बाळासाहेब लिगाडे ( रा. अकोला), अशी जखमी भावांची ...

Three people, including a doctor, were beaten for asking why they were filling sand in the field | शेतालगत वाळू का भरता असे विचारल्यावरून डॉक्टरसह तिघांना मारहाण

शेतालगत वाळू का भरता असे विचारल्यावरून डॉक्टरसह तिघांना मारहाण

Next

डॉ. महेशकुमार बाळासाहेब लिगाडे (रा. दत्तनगर-सांगोला), योगेश बाळासाहेब लिगाडे व सचिन बाळासाहेब लिगाडे ( रा. अकोला), अशी जखमी भावांची नावे आहेत.

सांगोला दत्तनगर येथील महेशकुमार लिगाडे यांना भाऊ सचिन निगडे यांनी फोन करून दिनेश खटकाळे, उमेश खटकाळे व संतोष खटकाळे हे तिघेजण मिळून महेशकुमार लिगाडे यांच्या माण नदीपात्रालगत पाटवडीला विनानंबर ४०७ टेम्पोत वाळू भरत होते.

त्यावेळी डॉ. लिगाडे त्यांनी तुम्ही येथे वाळू का भरत आहे असे विचारले असता नदी काय तुझ्या बापाची आहे का, असे म्हणून महेशकुमार लिगाडे व त्यांचा भाऊ योगेश व सचिन लिगाडे यांना शिवीगाळ करू लागले, त्यावेळी त्यांना शिवीगाळ का करता असे डॉ. लिगाडे म्हणाले असता दिनेश खटकाळे, उमेश खटकाळे व संतोष खटकाळे या तीन भावांनी खोऱ्याच्या दांड्याने डॉ. महेशकुमार लिगाडे यांच्या डोक्यात व पाठीत मारहाण केली, तर त्यांच्या दोन्ही भावांना शिवीगाळ, दमदाटी करीत जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत डॉ. महेशकुमार बाळासाहेब लिगाडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी तिघांच्या विरोधात भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

----

Web Title: Three people, including a doctor, were beaten for asking why they were filling sand in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.