मंगळवेढा कारागृहातील कोरोना बाधित तीन कैद्यी रात्री पळाले अन् पहाटे सापडले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 11:27 AM2020-07-20T11:27:59+5:302020-07-20T11:32:48+5:30

मंगळवेढा पोलिसांची कामगिरी; तीन पथकांच्या माध्यमातून पळालेल्या तिघांना पोलिसांनी परत केले जेरबंद

Three prisoners of Corona Jail escaped from Mangalvedha Jail at night and were found in the morning ...! | मंगळवेढा कारागृहातील कोरोना बाधित तीन कैद्यी रात्री पळाले अन् पहाटे सापडले...!

मंगळवेढा कारागृहातील कोरोना बाधित तीन कैद्यी रात्री पळाले अन् पहाटे सापडले...!

Next
ठळक मुद्दे मंगळवेढा सबजेलमधील ४० कैदी पैकी २८ कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल निगेटिव्ह १२ कैदी मंगळवेढा तहसिल कार्यालयात नव्याने उभारलेल्या सबजेल मध्ये शिफ्ट केलेएक कैदीने कारागृहाशेजारील किल्ला भाग मधील एक जणांची मोटारसायकल व मोबाईल चोरून धूम ठोकली

मंगळवेढा : मंगळवेढा सबजेलमधील कौलारू खालील लाकडी आडू वरील लोखंडी ग्रील वाकवून त्या फटीतून धूम ठोकलेले व विशेषत: कोरोना पॉझिटिव्ह असणारे तीन कैद्याच्या मंगळवेढा पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या आधारे मुसक्या आवळल्या. तीन आरोपीमध्ये दोघे मंगळवेढा परिसरात तर एक कैदी टाकळी सिकंदर ( ता मोहोळ) येथे चोरीची मोटारसायकलवरून जात असताना रंगेहाथ पकडले़ तिन्ही कैदी सापडल्याने मंगळवेढा पोलीस दलाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

 मंगळवेढा सबजेलमधील ४० कैदी पैकी २८ कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल येताच निगेटिव्ह १२ कैदी मंगळवेढा तहसिल कार्यालयात नव्याने उभारलेल्या सबजेल मध्ये शिफ्ट केले़ त्यामुळे जुन्या सबजेल मध्ये असणाºया २८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णापैकी ३ कैदी सोमवारी पहाटे तीन वाजता कौलारू खालील लाकडी आडू वरील लोखंडी ग्रील वाकवुन त्या फटीतून तिघेही बाहेर येऊन पळून जात असताना  धूम ठोकली़ यापैकी दोन कैदी जवळपास सापडले यापैकी एक कैदीने कारागृहाशेजारील किल्ला भाग मधील एक जणांची मोटारसायकल व मोबाईल चोरून धूम ठोकली.

ही घटना समजताच पोलीस अधीक्षक मनोज पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी दोन पोलीस अधिकारी व १५ पोलीस कर्मचारी यांची तीन पथके तयार करून वेगवेगळ्या दिशेने पाठवली़ यामध्ये पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी यांच्यासह अजित मिसाळ, सुनील मोरे, अनिल दाते, बजरंग माने, पोलीस मित्र विजय शेंडगे व सायबर सेलचे खंडू माळी यांच्या टीमने मोठ्या शिताफीने आरोपींना पकडले़ यामध्ये दोन आरोपी कारागृहाच्या जवळपास पहाटे पोलीस उपनिरीक्षक बामणे यांच्या टीमने चारच्या सुमारास पकडले़ तर तिसरा आरोपी किल्ला भागातील एकजणांची मोटारसायकल व मोबाईल चोरी करून धूम ठोकली, त्याला तांत्रिक मदतीच्या आधारे टाकळी सिकंदर ( ता मोहोळ)  येथे पोलीस गाडी आडवी लावून पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी व त्यांच्या टीमने  पकडले.

Web Title: Three prisoners of Corona Jail escaped from Mangalvedha Jail at night and were found in the morning ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.