सोलापुरात 3 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू
By admin | Published: July 1, 2017 08:00 PM2017-07-01T20:00:34+5:302017-07-01T20:55:42+5:30
आॅनलाइन लोकमत
सोलापूर, दि 1 - कासाळ ओढ्यावर असलेल्या बंधाऱ्यालगतच्या विहिरीत पोहोण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना कटफळ ( ता.सांगोला) येथे घडली आहे. शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कटफळ येथील रोहन प्रकाश गुंजवटे ( वय १०), संतोष अनिल धोत्रे ( वय १३) आणि गोपी दत्ता माने ( वय १२) ही मुले कासाळ ओढ्यावर असलेल्या बंधाऱ्यालगतच्या विहिरीवर पोहायला गेले होते.
हे सर्वजण शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी 5 वाजल्यानंतर पोहोण्यासाठी तेथे गेले होते. यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ही मुले बुडाली. व यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
या तिन्ही मुलांचे आईवडील मजुरीसाठी वसई ( जि.ठाणे) येथे वास्तव्यास असून तिन्ही मुले आपल्या आजीसोबत गावात राहत होते. या घटनेमुळे कटफळ गावावर शोककळा पसरली आहे.