संशयावरून तीन मेहुण्यांनी केली भावजीला बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 10:23 IST2025-02-20T09:57:35+5:302025-02-20T10:23:19+5:30
तीन मेहुण्यांसह सात जणांविरुद्ध सदर बाजार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

संशयावरून तीन मेहुण्यांनी केली भावजीला बेदम मारहाण
सोलापूर : कौटुंबिक वादात सासू व सासऱ्यांना पाठिंबा देत असल्याच्या संशयावरून भावजीला मारहाण केल्याप्रकरणी तीन मेहुण्यांसह सात जणांविरुद्ध सदर बाजार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
अब्दुल रशीद नदाफ, सोहेल रशीद नदाफ, फिरोज रशीद नदाफ, तौसिफ रशीद नदाफ (रा. मदनीनगर, सैफुल, सोलापूर), इम्तियाज नौशाद नदाफ, अदनान शेख (रा. फॉरेस्ट, सोलापूर), शाहीद दस्तगीर नदाफ (रा. सहारानगर भाग एक, सोलापूर), अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. फिर्यादी मोहम्मद उस्मान मोहम्मद इक्बाल नदाफ (वय ३४, रा. सहारानगर भाग एक, सोलापूर) यांचे अब्दुल नदाफ, सोहेल नदाफ, फिरोज नदाफ, तौसिफ नदाफ हे मेहुणे आहेत. मोहम्मद उस्मान नदाफ याचे सासू व सासऱ्याचा कौटुंबिक कारणावरून वाद सुरू आहे.
दरम्यान, या वादात मोहम्मद उस्मान नदाफ हे सासू व सासऱ्यांना पाठिंबा देत असल्याचा संशय मेहुणे अब्दुल नदाफ, सोहेल नदाफ, फिरोज नदाफ, तौसिफ नदाफ यांना आहे. यामुळे हे सर्व मोहम्मद उस्मान याच्यावर चिडून होते. या रागातूनच ३१ जानेवारी रोजी सायंकाळी मोदी कबरस्तानजवळ अब्दुल नदाफ व इतरांनी मोहम्मद उस्मान यास लाथाबुक्क्याने मारहाण करून जखमी केले.