तीन साखर कारखान्यांनी केले ७.३६ लाख मे. टन उसाचे गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:12 AM2020-12-28T04:12:37+5:302020-12-28T04:12:37+5:30
भैरवनाथ शुगर युनिट नंबर ३ या कारखान्याने चालू गळीत हंगामात ६४ दिवसांत २ लाख ६९ हजार २२० मे. ...
भैरवनाथ शुगर युनिट नंबर ३ या कारखान्याने चालू गळीत हंगामात ६४ दिवसांत २ लाख ६९ हजार २२० मे. टन उसाचे गाळप करून २ लाख ५१ हजार ७५० मे. टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. कारखान्याचा उतारा ९.८३ इतका आहे. कारखाना प्रतिदिन ४,४६० मे. टन उसाचे गाळप करत आहे. युटोपियन शुगरने चालू गळीत हंगामात २ लाख ८५ हजार ८०५ मे. टन उसाचे गाळप करून २ लाख २५ मे. टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा ८.८० टक्के इतका आहे. हा कारखाना प्रतिदिन ३,५१९ मे. टन उसाचे गाळप करत आहे. हा कारखाना बी प्लस हेवी मोलॅसिसचेही उत्पादन घेत असल्यामुळे या कारखान्याची रिकव्हरी कमी दिसत असली तरीही गळापाचे उद्दिष्ट मोठे आहे.