सोलापूर जिल्ह्यातील तीन शिक्षकांची आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 02:51 PM2019-01-29T14:51:10+5:302019-01-29T14:53:41+5:30
सोलापूर : सृजनशीलता आणि नवोपक्रम विषयावरील चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम सादरीकरणासाठी सोलापूर जिल्ह्यातील झेडपी शाळांमधील सुधीर नाचणे,योगेशकुमार भांगे ...
सोलापूर : सृजनशीलता आणि नवोपक्रम विषयावरील चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम सादरीकरणासाठी सोलापूर जिल्ह्यातील झेडपी शाळांमधील सुधीर नाचणे,योगेशकुमार भांगे व रवी चव्हाण या तीन शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
गुजरातमधील अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्थेतर्फे ही परिषद होत आहे.
या परिषदेसाठी महाराष्ट्रातील सहा शिक्षकांची निवड करण्यात आली असून, त्यात सोलापूर जिल्ह्यातील तीन शिक्षक आहेत. ग्रामीण भागात काम करणाºया या शिक्षकांनी कल्पकतेने आपल्या शाळांमध्ये आमूलाग्र बदल केला आहे. झेडपीचे प्राथमिक शिक्षण अधिकारी संजयकुमार राठोड, जिल्हा व्यावसायिक विकास संस्थेच्या प्राचार्या ज्योती मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिक्षकांनी अभिनव उपक्रम तयार केले आहेत. त्यांना सर फाउंडेशनचे सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, हेमा शिंदे यांनी मदत केली आहे.
या यशाबद्दल झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र्र भारुड, शिक्षण संचालक डॉ. सुनील मगर,उपसंचालक विकास गरड,संशोधन विभागाचे डॉ.गीतांजली बोरुडे यांनी कौतुक केले आहे. २८ जानेवारी रोजी या परिषदेचे उद्घाटन झाले. ३0 जानेवारीपर्यंत देशभरातील शिक्षक आपले संशोधनाचे या परिषदेत सादरीकरण करणार आहेत.
या उपक्रमाची दखल
च्झेडपीच्या यशवंतनगर (ता.माळशिरस) शाळेतील सुधीर नाचणे यांनी विद्यार्थ्यांची गणिताची भीती दूर व्हावी व मनोरंजक पद्धतीने गणित अध्यापन व्हावे यासाठी कृतियुक्त गणित पेटीची निर्मिती केली आहे. तर वडाचीवाडी (ता. माढा) येथील योगेशकुमार भांगे यांनी कर्णबधीर बालकांचा शोध घेण्यासाठी संशोधन करून ताटवाटीची चाचणी तयार केली आहे.
इंगोलेवस्ती (खंडाळी, ता. मोहोळ) येथील शाळेतील शिक्षक रवी चव्हाण यांनी लोकवर्गणीतून सोलार ऊर्जेसह शाळेचा भौतिकदृष्ट्या कायापालट केला. प्रा. विजय शेरीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली एज्युकेशन इनोव्हेशन बँक हा प्रोजेक्ट देशात सुरु आहे. या प्रकल्पांतर्गत या शिक्षकांना ३० जानेवारी रोजी अहमदाबाद येथील रवि जे मथाई सेंटर येथे सन्मानित करण्यात येणार आहे.