मतपेट्यांच्या संरक्षणासाठी त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:23 AM2021-04-20T04:23:26+5:302021-04-20T04:23:26+5:30
२५२ पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागली होती. १७ एप्रिल रोजी मतदान झाले. ५२४ ...
२५२ पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागली होती. १७ एप्रिल रोजी मतदान झाले. ५२४ मतदान केेंद्रात ३ लाख ४० हजार ८८९ मतदरांपैकी २ लाख २५ हजार ४८५ मतदरांनी मतदान केले. यामध्ये १ लाख २० हजार ६८४ पुरुष व १ लाख ४ हजार ८०१ स्त्री मतदरांचा समावेश आहे.
या पोटनिवडणुकीची मतमोजणी २ मे रोजी होणार आहे. यामुळे कोण विजयी होणार, हे २ मे रोजीच घोषित करण्यात येणार आहे. मतदान व मतमोजणीमध्ये १६ दिवसांचा कालावधी आहे. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, नि:पक्ष निकाल लागावा या उद्देशाने मतपेट्या ठेवण्यात आलेल्या शासकीय गोडाऊनला त्रिस्तरीय बंदोबस्त लावण्यात आला आहे.
---
असे आहे फौजफाटा
यामध्ये मतपेट्या नजीक सीआरपीएफचे पथक, गोडाऊनमध्ये एसआरपीएफ तर गोडाऊन बाहेर राज्य पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत. या बंदोबस्तात १ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व कर्मचारी असे एकूण ५० जण आहेत. दिवसा वेगळा व रात्री वेगळा असा दोन टप्प्यात बंदोबस्त असणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.
फोटो ::::::::::::::::
मतपेट्यांच्या संरक्षणासाठी नेमण्यात आलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी. (छाया : सचिन कांबळे)