एका कचरा कुंडीतून तीन टिपर; दोन दिवसांमध्ये २०५ टन कचरा

By दिपक दुपारगुडे | Published: July 1, 2023 07:37 PM2023-07-01T19:37:03+5:302023-07-01T19:37:59+5:30

आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अंदाजे १० ते १४ लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले होते

Three tippers from one waste bin, 205 tonnes of waste in two days in pandharpur | एका कचरा कुंडीतून तीन टिपर; दोन दिवसांमध्ये २०५ टन कचरा

एका कचरा कुंडीतून तीन टिपर; दोन दिवसांमध्ये २०५ टन कचरा

googlenewsNext

दीपक दुपारगुडे 

सोलापूर : आषाढी सोहळ्या दरम्यान शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात कचरा साठला होता. शहरातील गर्दी कमी होताच नगरपरिषदेने १ हजार ५०० कर्मचार्याच्या माध्यमातून यात्रा कालावधीत साठलेल्या कचरा उचलण्याची मोहीम सुरु केली आहे. एकाच कचरा कुंडातून तीन तीन टिपर भरुन कचरा निघाला आहे. तर दोन दिवसात घंटा गाड्यांच्या २८९ च्या आसपास फेऱ्या झाल्या. यामुळे शुक्रवारी व शनिवारी या दोन दिवसात २०५ टन उचलण्यात आला असल्याचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सांगितले.

आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अंदाजे १० ते १४ लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. ते वाखरी, रेल्वे स्टेशन, टाकळी, कासेगावर रोड, ६५ एकर यासह शहरातील अन्य मोकळी मैदाने, मठ, नागरिकांच्या घरात राहतात.  शहरात लाखो भाविकांची गर्दी असल्याने शहरातील सर्व रस्त्यावर गर्दी असते. यामुळे वाहनांना बंदी शहरातील रस्त्यावरुन ये-जा करता येत नाही. यामुळे अनेक ठिकाणी कचर्याचे ढिगारे साठतात. 

पंढरपूर नगरपरिषद, सोलापूर महानगरपालिका, बार्शी, मंगळवेढा, कुर्डुवाडी आदी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छता करण्यात येत आहे. कचरा उचल्यानंतर ब्लोअरद्वारे कल्चर फवारणी, दुर्गंधी नाशक औषध पावडर फवारणी करण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी आरविंद माळी, उपमुख्याधिकारी अधिकारी सुनिल वाळुजकर, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे यांनी सांगितले.

अशी आहे यंत्रणा
४५ घंटागाडी द्वारे दिवसा व रात्री २४ तास कचरा गोळा करण्याचे काम चालु आहे. शहरामध्ये कचरा त्वरीत उचलण्यासाठी २ जेसीबी, ८ टिपर, २ कॉम्पॅक्टर, १ डंपरप्लेसर, ८ डंपिंग ट्रॉलिद्वारे कचरा उचलण्यात येत असल्याचे आरोग्य अधिकारी शरद वाघमारे यांनी सांगितले.

६५ एकर परिसरात स्वच्छता सुरु
६५ एकरा मध्ये एकूण ४८७ प्लॉट भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. संपुर्ण ६५ एकर मध्ये लाखो भाविक राहीले असल्याने या भागात कचरा साठला होता. जसे दिंड्या प्लॉट सोडून जातील. तसे कचरा उचलण्याचे काम सुरु असून यासाठी १५० कर्मचारी काम करतआहेत

Web Title: Three tippers from one waste bin, 205 tonnes of waste in two days in pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.