पंढरपुरात तीन व्यापाऱ्यांवर कारावाई; छाप्यात पावने सहा लाखांचा गुटखा जप्त
By काशिनाथ वाघमारे | Published: March 8, 2024 08:22 PM2024-03-08T20:22:40+5:302024-03-08T20:23:13+5:30
पंढरपूर शहर पोलिसांनी तीन व्यापा-यांवर कारवाई करुन पाच लाख ७६ हजार ४३५ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
सोलापूर: मागील काही महिन्यांपासून पोलिस प्रशासनाने गुटख्याबाबत कारवाईचा धडाका सुरू केला असताना पंढरपुरात अनेकजण गुटखा होलसेल दरात करताना आढळून येत आहेत. पंढरपूर शहर पोलिसांनी तीन व्यापा-यांवर कारवाई करुन पाच लाख ७६ हजार ४३५ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. यानंतर अन्न व औषध प्रशासनाने पंचनामा केला. शहरात तीन ठिकाणी खुलेआम गुटखा विक्री होत असल्याची माहीती पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश भुजबळ, सहायक फौजदार राजेश गोसावी, नागनाथ कदम, सुरज हेबांडे, शरद कदम, शहाजी मंडले, बिपीन घुगरकर, नितीन जगताप, सिरमा गोडसे, समाधान माने, सचिन हेबांडे, नवनाथ माने, विनोद पाटील आणि विजय गायकवाड यांच्या पथकाने धाड टाकली.
यानंतर संजय पांडुरंग होनराव यांच्या जनरल स्टोअर्स दुकानातून ७२ हजार ५१५ रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू पान मसाला साठा जप्त केला. अजिज अब्दुल तांबोळी यांच्याकडून भोसले चौकातून ५ लाख १ हजार ३२० रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू पान मसाला जप्त केला. सागर उत्तम अभंगराव (रा. जुनी पेठ, कोळे गल्ली, पंढरपूर) याच्याकडून २६०० रुपयांचा सुगंधी पान मसाला, मावा साठा जप्त केला. यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी यु. एस. भुसे यांनी पंचनामा करुन वरील तिघांविरुद्ध फिर्याद दिली.