बाॅयलरचे पाणी अंगावर पडल्याने तीन कामगार जखमी
By प्रताप राठोड | Updated: March 4, 2023 17:54 IST2023-03-04T17:53:47+5:302023-03-04T17:54:07+5:30
जखमींना सोलापुरातील शासकीय रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बाॅयलरचे पाणी अंगावर पडल्याने तीन कामगार जखमी
सोलापूर : करमाळा तालुक्यातील कमलाई साखर कारखान्यामध्ये काम करित असताना बॉयलरचे पाणी अंगावर पडून तीन कामगार जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. यातील जखमींना सोलापुरातील शासकीय रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अण्णा पांडुरंग गायकवाड ( वय ५५, रा. देवराळी, ता. करमाळा), राजेंद्र रामचंद्र नलवडे (वय ४९, रा. करमाळा ), बबलू कुमार ( वय ३०, रा. करमाळा, जि. सोलापूर ) असे जखमी झालेल्या कामगारांचे नाव आहे. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तिघेजण हे कारखान्यातील बॉयलरजवळ काम करित असताना तिघांच्या अंगावर बॉयलरचे गरम पाणी पडले. यामुळे सर्वांगास जखम झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी करमाळा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात नातेवाईकांनी दाखल केले.