रेल्वेत चोरी करणाºया आरोपीस तीन वर्षे कारावास, मंगळसूत्र चोरल्याचा आरोप, लोहमार्ग न्यायालयाचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 09:09 AM2018-02-22T09:09:28+5:302018-02-22T09:10:28+5:30
हैदराबाद-मुंबई रेल्वेत प्रवास करणाºया महिलेचे मंगळसूत्र चोरल्याप्रकरणी आरोपी सचिन विलास गायकवाड ( वय ३४, रा. रामवाडी, सोलापूर) यास न्यायदंडाधिकारी ओ. एस. पाटील यांनी ३ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २२ : हैदराबाद-मुंबई रेल्वेत प्रवास करणाºया महिलेचे मंगळसूत्र चोरल्याप्रकरणी आरोपी सचिन विलास गायकवाड ( वय ३४, रा. रामवाडी, सोलापूर) यास न्यायदंडाधिकारी ओ. एस. पाटील यांनी ३ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. लोहमार्ग न्यायालयात आज (बुधवारी) या फौजदारी खटल्याची सुनावणी झाली.
या खटल्यातील फिर्यादी दामर कोंडा मुरली कृष्णा (रा. शांतीनगर पॅलेस, सुभेदारी अनय कोंडा, आंध्रप्रदेश) या ६ जुलै २००७ रोजी रात्री ८.४० वाजता हैदराबाद येथून पुण्याला येण्यासाठी हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस या रेल्वेच्या एस २ या डब्यातून आसन क्र. २ वर बसल्या होत्या. गाडी सोलापूर-कुर्डूवाडी दरम्यान सिग्नलला थांबली होती. दरम्यान, आरोपीने खिडकीत हात घालून फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओढू लागला. त्यावेळी फिर्यादी जागी झाल्याने तिने मंगळसूत्र पकडले. त्यावेळी आरोपीशी झालेल्या झटापटीत आरोपीने फिर्यादीचे अर्धे मंगळसूत्र तोडून चोरुन नेले. चोरलेले मंगळसूत्र ३० ग्रॅम वजनाचे होते. फिर्यादीच्या हातात १० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र राहिले.
झाल्या प्रकाराची फिर्यादीने कुर्डूवाडी लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर तपास अधिकारी जफरे यांनी तपास करुन आरोपी सचिन विलास गायकवाड (वय ३४, रा. रामवाडी, जि. सोलापूर) यास अटक करुन त्याच्याविरुद्ध लोहमार्ग न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
यामध्ये फिर्यादी, साक्षीदार पंच अशोक रायपुरे, पोलीस हणमंत खताळ यांचा पुरावा ग्राह्य मानून सोलापूर दौºयावर असलेले न्यायदंडाधिकारी ओ. एस. पाटील यांनी आज (बुधवारी) आरोपीस ३ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. यामध्ये सरकारपक्षातर्फे अॅड. अमर डोके यांनी व त्यांना पैरवी शेख व राऊत यांनी मदत केली. आरोपीतर्फे अॅड. पी. एम. लियाकत यांनी काम पाहिले.