सोलापूर, माढ्यातील भाजपचे उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर

By appasaheb.patil | Published: May 23, 2019 04:19 PM2019-05-23T16:19:05+5:302019-05-23T16:20:59+5:30

सहकारमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर जल्लोष व फटाक्यांची आतषबाजी

On the threshold of BJP candidate from Solapur, Madha | सोलापूर, माढ्यातील भाजपचे उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर

सोलापूर, माढ्यातील भाजपचे उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर

Next
ठळक मुद्दे- शहरात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोषाची तयारी- शिवसेनेने लाडू वाटप करून केला जल्लोष- वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसला फटका बसल्याची शक्यता

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जयसिध्देश्वर महास्वामी हे १ लाख ३१ हजार मतांनी आघाडीवर आहेत़ तर माढ्यातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे ५० हजार मतांनी आघाडीवर आहेत़ दोघांचा विजय निश्चितच मानत सहकारमंत्री सुभाष देशमुख याच्या निवासस्थानावर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे़ सायंकाळी चार वाजेपर्यंत हाती आलेल्या मतमोजणीच्या आकडेवारीवरून सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जयसिध्देश्वर महास्वामी यांना ४ लाख ३ हजार ९००, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना २ लाख ७२ हजार ६११, वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांना १ लाख २२ हजार ९०२ मते आतापर्यंत मिळाली आहेत़ सोलापूर लोकसभा मतदारसंघातील ८ लाख १६ हजार ९१६ मतांची मोजणी पूर्ण झाली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना आतापर्यंत ४ लाख ४८ हजार ६८ तर राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांना ३ लाख ८९ हजार २५० मते मिळाली आहेत. विजय निश्चित मानत रणजितसिंह निंबाळकर यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी भेट घेऊन शुभेच्छा स्वीकारल्या.
 

Web Title: On the threshold of BJP candidate from Solapur, Madha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.