दारूचा ग्लास टाकून हाती चहाचा ग्लास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:24 AM2021-09-26T04:24:29+5:302021-09-26T04:24:29+5:30

ही किमया साधली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यात चालू असलेल्या ‘ऑपरेशन परिवर्तन’ उपक्रमामुळे. बेंबळे ...

Throw a glass of liquor and a glass of tea in hand! | दारूचा ग्लास टाकून हाती चहाचा ग्लास !

दारूचा ग्लास टाकून हाती चहाचा ग्लास !

Next

ही किमया साधली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यात चालू असलेल्या ‘ऑपरेशन परिवर्तन’ उपक्रमामुळे. बेंबळे येथील इंद्रजित काळे (५८), समाधान ऊर्फ पप्पू काळे (३२), सविता भोसले (३०) व अभिमान किर्ते (५०) हे गेल्या अनेक वर्षापासून बेंबळे गावात अवैधरीत्या हातभट्टीची दारू विक्री करीत होते. त्यांच्यावर टेंभुर्णी पोलिसांनी अनेक वेळा दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले होते. या लोकांकडे उपजीविकेचे दुसरे साधन नसल्याने काही काळानंतर पुन्हा अवैध दारू विक्री करीत होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी अशा लोकांना या अवैध धंद्यापासून परावर्तित करण्यासाठी ‘ऑपरेशन परिवर्तन’ उपक्रम चालू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून टेंभुर्णी ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी बेंबळे गाव दत्तक घेतले. नंतर त्यांनी वैध दारू विक्री करणाऱ्या लोकांची भेट घेऊन त्यांना इतर व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यासाठी गावकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले व आर्थिक मदतीसाठी बँकांचे सहकार्य घेण्याचे सूचित केले. पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या प्रयत्नास यश आले आहे.

बेंबळे गावाप्रमाणेच टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील इतर गावातूनही अवैध हातभट्टी दारूचे उच्चाटन करण्यात येईल असे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी सांगितले.

-----

परितवर्तनास प्रारंभ

हातभट्टीची दारूविक्री करण्यासाठी वापरले जाणारे ग्लास टाकून सविता भोसले या महिलेने आता चहाचे ग्लास हातात घेऊन हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे तर चाळीस वर्षापासून दारूविक्री करणाऱ्या इंद्रजित काळे यानेही हॉटेल व्यवसाय चालू केला आहे. समाधान काळे याने आता म्हशी खरेदी करून दुग्ध व्यवसाय चालू केला आहे तर अभिमान किर्ते यांनी अवैध दारूविक्री बंद करून शेतमजुरी करणे पसंत केले आहे. परिवर्तनाची नांदी खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे.

----

हाॅटेल व्यवसाय चालू केलेली सविता भोसले.

----

Web Title: Throw a glass of liquor and a glass of tea in hand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.