रेल्वे सुटायच्या अर्धा तास अगोदरपर्यंत तिकीटाची माहिती मिळणार
By appasaheb.patil | Published: October 16, 2020 04:22 PM2020-10-16T16:22:59+5:302020-10-16T16:25:07+5:30
दोन वेळा निघणार आरक्षण चार्ट; प्रवाशांना मिळणार दिलासा
सोलापूर : भारतीय रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे़ आता रेल्वे गाडी सुटण्यापुर्वी अर्धा तासापर्यंत प्रवासी आपले तिकीट बुक करून सीट कन्फम करू शकणार आहेत़ कारण रेल्वेने आता एकवेळ नव्हे तर अडीच तासाच्या फरकाने दोनवेळा आरक्षण चार्ट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
लांब पल्ल्याच्या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात रेल्वेने प्रवास केला जातो. अनेकदा प्रवासाला निघण्यापूर्वी तिकीट आरक्षणाबाबत प्रवासी धास्तावलेले असतात. प्रतीक्षा यादीतील तिकीट कन्फर्म होईल का, याची चिंता प्रवाशांना नेहमी सतावते. अनेकदा तिकीट कन्फर्म होत नाही. यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. मात्र, रेल्वे प्रशासनाने यावर उपाय शोधून काढला असून, रिझर्व्हेशन चार्ट तयार झाला तरी, प्रवासी कन्फर्म तिकीट मिळवू शकतात. कारण आता रेल्वे सुटायच्या अर्धा तास अगोदरपर्यंत प्रवासी आपले तिकीट कन्फम करून सीट मिळवू शकतात़ पुर्वी अडीच तासापुर्वी बनविला जाणारा आरक्षण चार्ट आता रेल्वे सुटण्याअगोदर अर्धा तास अगोदरही बनविण्यात येणार आहे़ त्यामुळे तिकीट वेटिंगचे प्रमाण कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
----------
तिकीटातला बदल अर्धा तासात दिसेल
एखाद्या गाडीचा पहिले आरक्षण चार्ट अडीच तासापुर्वी तयार होत होते़ त्यानंतर तिकीट रद्द करणाºया प्रवाशांची माहिती आरक्षण चार्टमध्ये दिसून येत नव्हती़ आता नव्या नियमांनुसार रेल्वे सुटायच्या अर्धा तास अगोदरपर्यंत प्रवाशांना आपले तिकीट कन्फम झाले की नाही हे समजणार आहे़ या कालावधीत प्रवाशांनी तिकीट आरक्षित केल्यास तसा बदल दुसºया यादीत झालेला दिसणार असल्याचे रेल्वेने सांगितले़
----------
आरक्षण यादी आॅनलाइन पाहता येणार
प्रवाशांना रेल्वे आरक्षण यादी (रिझर्व्हेशन चार्ट) आता आॅनलाइन पाहता येणार आहे. यामुळे एखाद्या गाडीची आरक्षण यादी तयार झाल्यानंतरही त्या गाडीतील रिकाम्या जागा, आरक्षित केलेल्या जागा आणि अंशत: आरक्षित जागांची माहिती प्रवाशांना सहज उपलब्ध होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले़ पूर्वी हिच माहिती १३९ या टोल फ्री वरुन एसएमएसद्वारे मिळायची आता आॅनलाईनमुळे आणखी पारदर्शी आला आहे़