सोलापूर: कर्ज लई झालं म्हणून कंटाळलेल्या शेतकऱ्यानं केला आयुष्य संपवण्याचा प्रयत्न
By विलास जळकोटकर | Published: April 10, 2023 06:27 PM2023-04-10T18:27:26+5:302023-04-10T18:27:40+5:30
सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.
सोलापूर: कर्ज लई झालं, हे फेडायचं कसं या विवंचनेत एका तरुण शेतकऱ्यानं गवतावर फवारण्याचा विषारी औषध प्राशन करुन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने रुग्णालयात उपचारास नेण्यात आले. ही घटना मोडनिंब (ता. माढा, जि. सोलापूर) येथे रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.
नवनाथ जालिंदर हाके (वय- ३५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. यातील शेतकरी नवनाथ हाक्के याने प्रापंचिक अडचणीसाठी कर्ज काढले होते. मात्र हे कसे फेडायचे ही विवंचना त्याला सारखी भेडसावत होती. नेहमीच्याच या कर्जाला कंटाळून त्याने त्यापेक्षा जीव संपवावा या विचाराने रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नवनाथने कोणालाही कल्पना देता घरा गवतावर फवारण्यासाठी आणलेले तणनाशक प्राशन केले. काही वेळानं त्रास होऊ लागल्याने नातलगांनी तातडीने गावातल्या खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार घेतले.
पुढील उपचारासाठी रात्री ११:४५ च्या सुमारास सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.