सोलापूरचे बालाजीभक्त मोटारीच्या मार्गाने सहा तास लवकर पोहोचणार तिरूपतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 03:34 PM2019-02-28T15:34:35+5:302019-02-28T15:38:02+5:30

सोलापूर : नियोजित भारतमाला परियोजनेंतर्गत मुंबई-चेन्नई या सोलापूर जिल्ह्यातून कर्नुलकडे जाणाºया ‘ग्रीन फिल्ड’ महामार्गामुळे ११० कि़मी़ अंतर कमी होणार ...

Tirupati will reach six hours early in Solapur's Balaji bhakt by the way | सोलापूरचे बालाजीभक्त मोटारीच्या मार्गाने सहा तास लवकर पोहोचणार तिरूपतीला

सोलापूरचे बालाजीभक्त मोटारीच्या मार्गाने सहा तास लवकर पोहोचणार तिरूपतीला

googlenewsNext
ठळक मुद्देसंपूर्णत: शेतजमिनीतून नवा महामार्ग करण्यात येणाऱ मार्गासाठी इमारती, घरे न पाडता तो विकसित केला जाणाररस्ता शेतजमिनीतून असल्याने मानवी अडथळे कमी तसेच वाहने वेगाने मार्गक्रमण करणे शक्य अस्तित्वातील महामार्गाचे अंतर कमी झाल्याने वेळेची बचत होईल

सोलापूर : नियोजित भारतमाला परियोजनेंतर्गत मुंबई-चेन्नई या सोलापूर जिल्ह्यातून कर्नुलकडे जाणाºया ‘ग्रीन फिल्ड’ महामार्गामुळे ११० कि़मी़ अंतर कमी होणार असून विनाअडथळा शेतातून जाणाºया या महामार्गामुळे  सोलापुरातील तिरुपती बालाजीच्या भक्तांसाठी ही गुड न्यूज असूून त्यांच्या प्रवासासाठी लागणाºया वेळेत बचत होणार  आहे.

केंद्र सरकारच्या दळणवळण मंत्रालयाने सर्व राज्यांना जोडणारी भारतमाला परियोजना अंमलात आणली आहे़ त्यात महाराष्टÑातील  दोन महामार्गांचा समावेश आहे. ‘ग्रीन फिल्ड अलाईनमेंट’ असे नामाभिधान धारण केलेली ही महत्त्वाकांक्षी योजना असून ती सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान    ठरणारी आहे़ मुंबई ते चेन्नई हा चौपदरी मार्ग सोलापुरातून जातो़ अक्कलकोटपासून तो गावांच्या बाजूने शेतजमिनीतून जाणार आहे़ अक्कलकोट ते कर्नुल सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याऐवजी तो सरळ रेषेत जाणार आहे़ त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे़ 

अक्कलकोटहून मैंदर्गी-दुधनी-गाणगापूर-जेवरगी-यादगिर-रायचूर-कर्नुल असा हा नवीन ‘ग्रीन फिल्ड’ महामार्ग अस्तित्वात येणार आहे़ सध्या या मार्गाची लांबी ३८३ कि़मी़ आहे़ आता ती २७३ कि़मी़ होणार असल्याने सध्याच्या रस्त्यापेक्षा ११० कि़मी़ अंतर कमी होणार आहे़ साहजिकच त्यामुळे तिरुपती बालाजीला जाण्यासाठी किमान तीन तास वेळेची बचत होणार आहे़ सध्या हा रस्ता अक्कलकोटहून वागदरी-आळंद-गुलबर्गा मार्गे वळणा-वळणाने कर्नुलकडे जातो़ सरळ रस्ता झाल्याने प्रवाशांच्या वेळेतही बचत होणार आहे़

नव्या ग्रीन फिल्ड मार्गाची वैशिष्ट्ये

  • - संपूर्णत: शेतजमिनीतून नवा महामार्ग करण्यात येणाऱ मार्गासाठी इमारती, घरे न पाडता तो विकसित केला जाणार आहे़ 
  • - रस्ता शेतजमिनीतून असल्याने मानवी अडथळे कमी तसेच वाहने वेगाने मार्गक्रमण करणे शक्य होईल़ 
  • - अस्तित्वातील महामार्गाचे अंतर कमी झाल्याने वेळेची बचत होईल़ 
  • - या मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, रायलसीमा (आंध्रप्रदेश) या परिसराचा आर्थिक विकास झपाट्याने होण्यास मदत होईल़ 
  • - भीमा, कृष्णा आणि तुंगभद्रा नद्या ओलांडून रस्ता जाणार आहे़ मार्गात डोंगर, मोठाले चढउतार असणार नाहीत़ 
  • - तिरुपतीचे अंतर ११० किमी कमी,वेळेत होणार पाच तासांची बचत

३०० हेक्टरचे भूसंपादन

  • - नव्याने होणाºया ‘ग्रीन फिल्ड’ अलाईनमेंटसाठी अक्कलकोटपासून सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीत येणाºया २६ कि़मी़ महामार्गासाठी ३०१ हेक्टर शेतजमीन संपादित करण्यात येणार आहे़ हा संपूर्ण रस्ता शेतजमिनीतून जाणार आहे़ अक्कलकोट ते महेबूब नगरपर्यंत दुपदरी मार्ग असून तेथून पुढे तो चौपदरी असेल़ 

चार राज्यांना जोडणारा महामार्ग 

  • - मुंबई ते चेन्नई हा नवीन ग्रीनफील्ड अलाईनमेंट महामार्ग महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशला जोडला जाणार आहे़ नगरमार्गे करमाळा-सिद्धेवाडी-शेटफळ जवळ राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यात येणार असून शेटफळ ते अक्कलकोट या सध्या अस्तित्वात असलेल्या मार्गाचाच वापर केला जाणार आहे़ 

Web Title: Tirupati will reach six hours early in Solapur's Balaji bhakt by the way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.