Solapur: सोलापूर जिल्हा धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करणार; मंगलप्रभात लोढा यांचे आश्वासन
By Appasaheb.patil | Published: July 3, 2023 12:45 PM2023-07-03T12:45:59+5:302023-07-03T12:46:30+5:30
Solapur: सोलापूर शहर जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाजुला अनेक धार्मिक तीर्थक्षेत्र आहेत त्यामुळे जिल्ह्याला धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करणार तसेच केटरिंग कॉलेजला श्री स्वामी समर्थांचे नाव देण्यात येणार असल्याचे राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - सोलापूर शहर जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाजुला अनेक धार्मिक तीर्थक्षेत्र आहेत त्यामुळे जिल्ह्याला धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करणार तसेच केटरिंग कॉलेजला श्री स्वामी समर्थांचे नाव देण्यात येणार असल्याचे राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
पर्यटन विभागाच्या वतीने केटरिंग कॉलेजच्या पदवी पदविका अभ्यासक्रमाचा शुभारंभ लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य, आ.विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, सचिन कल्याणशेट्टी, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पर्यटन विभागाचे संचालक डॉ. भगवतंराव पाटील, व्यवस्थापकिय संचालक श्रध्दा जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.
गुरू पोर्णिमेचा मुहूर्त साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कॉलेजच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातून हॉटेल व्यवसायासाठी लागणारे चांगले मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात पर्यटनाचा ओघ सुध्दा वाढणार आहे. असेही नामदार लोढा यांनी यावेळी सांगितले.
या सर्व लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून नामदार मंगलप्रभात लोढा यांनी सोलापूर जिल्ह्याला धार्मिक पर्यटन क्षेत्राचा दर्जा लवकरच देणार असल्याचे जाहिर केले. सूत्रसंचालन एैश्वर्या हिबारे तर आभार प्राचार्य चंद्रशेखर जयस्वाल यांनी व्यक्त केले. सोलापूरच्या इतिहासात आणि विकासाला नव्याने चालना मिळणाऱ्या या केटरिंग कॉलेजच्या अभ्यासक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी मोठ्याप्रमाणात नागरीकांनी गर्दी केली होती.