आजअखेर १ लाख २६ हजार जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:25 AM2021-05-25T04:25:18+5:302021-05-25T04:25:18+5:30
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. असे असले तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ...
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. असे असले तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. काहीकाळ गायब झालेल्या कोरोनाने पुन्हा उसळी घेतली आहे. मागील महिन्याभरापासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा फैलाव झपाट्याने होत आहे. त्यातच कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील १३ लाख ६७ हजार ४४७ संशयितांची रॅपिड अँटिजन टेस्ट व स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी १ लाख ४५ हजार १२० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह, तर १२ लाख २१ हजार ९८८ अहवाल निगेटिव्ह आले असून, ३४० अहवाल प्रलंबित आहेत. सद्य:स्थितीत १५ हजार ३०७ रुग्ण उपचार घेत आहेत.
तालुकानिहाय बरे झालेली रुग्णसंख्या
सोलापूर शहर २५ हजार ७९४, अक्कलकोट २ हजार ४८०, बार्शी १४ हजार ९६५, करमाळा ८ हजार ९४८, माढा १२ हजार ६६५, माळशिरस १७ हजार ५१०, मंगळवेढा ७ हजार ११८, मोहोळ ५ हजार २९३, उत्तर सोलापूर २ हजार २३२, पंढरपूर २० हजार १७३, सांगोला ५ हजार ८२०, दक्षिण सोलापूर ३ हजार ४६ अशी १ लाख २६ हजार ४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.