आज मोक्षदा एकादशी; पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणीमातेच्या कपाळावर चंदन अन् तुळशीपत्र

By Appasaheb.patil | Published: December 25, 2020 01:19 PM2020-12-25T13:19:00+5:302020-12-25T14:14:07+5:30

मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशीनिमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी

Today is Mokshada Ekadashi; Vitthal-Ruk in Pandharpur | आज मोक्षदा एकादशी; पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणीमातेच्या कपाळावर चंदन अन् तुळशीपत्र

आज मोक्षदा एकादशी; पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणीमातेच्या कपाळावर चंदन अन् तुळशीपत्र

googlenewsNext

सोलापूर - तीर्थक्षेत्र पंढरपूर - आज (शुक्रवारी) मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशीनिमित्त श्री विठुराय आणि रूक्मिणीमातेच्या कपाळावर चंदन गंधासह तुळशीपत्रही लावण्यात आले. प्रत्येक एकादशीला देवांना कपाळावर असे तुळशीपत्र लावण्यात येते. तसेच थंडीमुळे कानपट्टी, उबदार शालही पांघरण्यात आली आहे. 

२५ डिसेंबर रोजी इंग्रजी वर्षातील शेवटची एकादशी आहे, ती म्हणजे मोक्षदा एकादशी! मार्गशीर्ष मास केशव मास म्हणून ओळखला जातो. म्हणून या एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केली जाते. 

हिंदू धर्मात एकादशीला अतिशय महत्त्व असते. वर्षभरात एकूण २४ एकादशी येतात. अधिक मास आल्यास त्यात आणखी दोन एकादशींची भर पडून त्या २६ होतात. मार्गशीर्ष शुक्ल पक्षात येणारी एकादशी मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते. मोक्ष प्राप्तीच्या दृष्टीने या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व असते. मोक्ष देणारी म्हणून मोक्षदा एकादशी असे तिचे नाव आहे, म्हणून काही ठिकाणी ती वैकुंठ एकादशीही म्हटली जाते. नरदेहातून सुटका झाल्यावर आत्म्याला मोक्ष मिळावा, म्हणून यादिवशी भगवान विष्णू यांची आराधना केली जाते. 

Web Title: Today is Mokshada Ekadashi; Vitthal-Ruk in Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.