शौचालय अनुदानाची रक्कम हडप; चुंगीच्या ग्रामसेवकाला केले निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 01:18 PM2018-10-16T13:18:57+5:302018-10-16T13:20:49+5:30
सोलापूर : शौचालय अनुदानाची रक्कम स्वत:कडे ठेवून अनियमितता व नियमबाह्य वर्तन केल्याप्रकरणी चुंगी (ता़ अक्कलकोट) येथील ग्रामसेवक बी़ एस़ ...
सोलापूर : शौचालय अनुदानाची रक्कम स्वत:कडे ठेवून अनियमितता व नियमबाह्य वर्तन केल्याप्रकरणी चुंगी (ता़ अक्कलकोट) येथील ग्रामसेवक बी़ एस़ नलवडे यांना सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड यांनी मंगळवारी निलंबित केले.
ग्रामसेवक बी़ एस़ नलवडे हे अक्कलकोट पंचायत समिती गटाकडील चुंगी ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत होते़ या काळात अनियमित कामकाज करणे, ग्रामपंचायत चुंगी येथील १७ लाभार्थ्यांचे शौचालयाचे १ लाख २० हजार ५७० रूपयाचे अनुदान स्वत:कडे ठेवून अनियमितता व नियमबाह्य वर्तन करणे, मुख्यालयात न राहणे, साजामध्ये विनापरवाना गैरहजर राहणे, गैरहजर कालावधीत पदभार हस्तांतरित न करणे आदी कारणांचा त्यांच्यावर ठपका होता.
याप्रकरणी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम ३ मधील तरतुदीनुसार सीईओ राजेंद्र भारूड यांनी त्यांना निलंबित केले़