तुरीचा तोरा वाढला.. भावात आठशे रुपये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:40 AM2021-02-06T04:40:37+5:302021-02-06T04:40:37+5:30
बार्शी ही उतार मालासाठी राज्यात प्रसिद्ध असलेली बाजारपेठ आहे़ येथे सोलापूर, उस्मानाबाद व अहमदनगर जिल्ह्यांतून विक्रीसाठी शेतमाल ...
बार्शी ही उतार मालासाठी राज्यात प्रसिद्ध असलेली बाजारपेठ आहे़ येथे सोलापूर, उस्मानाबाद व अहमदनगर जिल्ह्यांतून विक्रीसाठी शेतमाल येत आहे़ तुरीचे दर हे गेल्या महिन्यात साडेपाच हजारांपर्यंत खाली आले होते़ त्यात हळूहळू वाढ होत गेली़ आठ दिवसांपूर्वी तूर सहा हजार होती़ पाच दिवसांत यामध्ये सहाशे रुपयांनी वाढ होऊन शुक्रवारी ६८०० रुपये दराने विक्री झाली़ तसेच नवीन ज्वारीचीदेखील आवक सुरू झाली आहे़ शुक्रवारी नगर जिल्ह्ह्यातील जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांची ज्यूट ज्वारी ४५०० रुपये क्विंटल दराने खरेदी केल्याचे खरेदीदार तुकाराम माने यांनी सांगितले़ ज्वारीची १०० कट्टे आवक झाली होती़ हळूहळू ज्वारीची आवकदेखील वाढेल, असे बाजार समितीचे सचिव तुकाराम जगदाळे यांनी सांगितले़