लग्नाचे अमिष दाखवून सोलापूरातील महिला पोलिसावर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 10:35 AM2018-09-18T10:35:35+5:302018-09-18T10:37:15+5:30
माजी सीमा सुरक्षा दलाच्या जवानाविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापूर : महिला पोलीस कर्मचाºयाला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी माजी सीमा सुरक्षा दलाच्या जवानाविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुधीर तुकाराम पाटील (वय ३५, रा. उमानगरी, मुरारजी पेठ, सोलापूर) असे आरोपीचे नाव असून, त्याच्यासोबत सोनाली सुधीर पाटील, संजीवनी लामकाने, अमोल झुंझुरके या तिघांविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे. सुधीर तुकाराम पाटील हा सीमा सुरक्षा दलात जवान होता. त्याने राजीनामा देऊन सोलापुरात आॅनलाईन बिझनेस नेटवर्किंगचे काम करीत होता.
या नेटवर्किंगच्या माध्यमातून त्याने महिला पोलीस कर्मचाºयाशी मैत्री केली. लग्नाचे आमिष दाखवून त्याने डिसेंबर २०१७ ते १४ सप्टेंबर २०१८ दरम्यान वेळोवेळी अत्याचार केले. साखरपुडा करतो म्हणून ५ जून २0१८ रोजी महिला पोलिसाला अक्कलकोट येथे नेले व मारहाण करून ८00 रुपये काढून घेतले.
सुधीर पाटील याला अटक करण्यात आली असून सोमवारी न्यायालयासमोर उभे केले असता २0 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. महिला पोलीस कर्मचारी ही अनुसूचित जाती प्रवर्गाची असल्याने अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घराची नासधूस केली
- सुधीर लग्न करीत नसल्याने पीडित महिला पोलीस ही त्याच्या घरी गेली तेव्हा सोनाली पाटील, संजीवनी लामकाने, अमोल झुंझुरके यांनी जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले. यावर आरोपी न थांबता त्यांनी पीडित महिला पोलिसाच्या घरी गेले व तिच्या घरातील साहित्याची नासधूस केली.