ऊसतोड मजूर घेऊन निघालेला ट्रॅक्टर पलटी; नऊ मजूर गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 11:47 AM2020-01-23T11:47:14+5:302020-01-23T11:48:42+5:30
व्होळे येथील घटना; अपघातातील मजूर मराठवाडा, कर्नाटकातील रहिवाशी
कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील व्होळे (खु) गावच्या हद्दीत भेंड ते व्होळे रस्त्यावरील सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या कॅनॉलवर गुरुवारी सकाळी साडे आठ वाजता एका शेतकºयाच्या शेतात ऊसतोड करण्यासाठी मजूर घेऊन निघालेल्या टॅक्टरची ट्रॉली पलटी झाली़ या अपघातात नऊ मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
गुरुवारी सकाळी झालेल्या अपघातात( एमएच ४५- एफ-९१८९) हा टॅक्टर लऊळकडून व्होळेकडे ऊसतोडणी करण्यासाठी जात असताना ट्रॉली पलटी झाली. यावेळी अपघातात टॅक्टरचे हेडही ट्रॉलीवर जाऊन आदळ्याने त्यातील आबाजी काशिनाथ साळुंखे (वय- ३२,भालकी, जि. बिदर), कृष्णा पवार (रा. खुदनपूर, ता भालकी), अरुण साळुंखे (वय-२२, लातूर), रेखा साळुंखे ( वय-२५, भालकी जि. बिदर), दीपक उत्तम साळुंखे ( वय १२, लातूर), सरिता साळुंखे( वय १ ), अरुण साळुंखे (रा. चिंचोली ता. भालकी), श्रीदेवी पवार (वय -२३, चिंचोली ता. भालकी) व छकु साळुंखे ( वय २४ भालकी जि. बिदर) आदी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना बालाजी कोळेकरने ताबडतोब कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्यावर प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापुरकडे हलवण्यात आले आहे असे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ़ संतोष आडगळे यांनी सांगितले आहे.