व्यापार, उद्योग ठप्प झालेत; नऊ दिवसांची संचारबंदी तीन दिवसांवर आणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:15 AM2021-07-09T04:15:37+5:302021-07-09T04:15:37+5:30
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आषाढी यात्रा भरवण्याबाबत निर्बंध घातले आहेत. जिल्हा प्रशासनाने १७ जुलै ते २५ जुलै अशी ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आषाढी यात्रा भरवण्याबाबत निर्बंध घातले आहेत. जिल्हा प्रशासनाने १७ जुलै ते २५ जुलै अशी नऊ दिवस पंढरपूर शहर व आजूबाजूच्या दहा गांवात संचारबंदी जाहीर केली आहे. ही संचारबंदी अन्यायकारक आहे.
आषाढी यात्रा होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन त्रिस्तरीय बंदोबस्त ठेवणार आहे. त्यामुळे बाहेर गावचे लोक पंढरपूर शहरात येऊ शकणार नाहीत, त्यामुळे पंढरपूर शहर व बाजूच्या दहा गावांत जाहीर केलेली संचारबंदीमुळे सर्वच व्यापार ठप्प होऊन व्यापारी वर्गाच नुकसान होणार असून, हे अन्यायकारक आहे. तरी केवळ १९, २० व २१ जुलै असे तीनच दिवस संचारबंदी जाहीर करावी. नऊ दिवसांच्या संचारबंदीला पंढरपूर व्यापारी महासंघाचा विरोध असून, याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन दिले आले. यावेळी व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष सत्यविजय मोहोळकर, कौस्तुभ गुंडेवार, वैभव येवनकर, भूषण मोहोळकर, हेमंत विभुते, घोडके, मोरे इत्यादी व्यापारी उपस्थित होते.
कोट ::::::::::::::::::::
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी संचारबंदी केली आहे. व्यापाऱ्यांकडून संचारबंदीचा कालावधी कमी करण्याबाबत मागणी होत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा झाली आहे. परंतु १७ जुलैपासूनच संचारबंदी करणे आवश्यक आहे. १७ जुलैच्या सायंकाळी ४ वाजल्यापासून ही संचारबंदी सुरु होणार आहे. २५ जुलैपर्यंत मानाच्या पालाख्या पंढरपुरात राहणार आहेत. यामुळे संचारबंदीचा कालावधी कमी करता येणार नाही.
- तेजस्वी सातपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक
फोटो : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याबरोबर चर्चा करताना महासंघाचे उपाध्यक्ष सत्यविजय मोहोळकर, कौस्तुभ गुंडेवार, वैभव येवनकर, भूषण मोहोळकर, हेमंत विभुते.