फिरस्त्या व्यापाऱ्यांचा व्यापार बंद; रोजीरोटीसाठी करावी लागते शेतात मजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:28 AM2021-09-16T04:28:02+5:302021-09-16T04:28:02+5:30

माढा तालुक्यातील कुर्डूवाडी, टेंभुर्णी, मोडनिंब, माढा, माळशिरस तालुक्यातील अकलूज, माळशिरस, मोहोळ तालुक्यातील अनगर व मोहोळ या आठवडी बाजारात जाऊन ...

Trade of nomadic traders closed; Wages in the field have to be done for a living | फिरस्त्या व्यापाऱ्यांचा व्यापार बंद; रोजीरोटीसाठी करावी लागते शेतात मजुरी

फिरस्त्या व्यापाऱ्यांचा व्यापार बंद; रोजीरोटीसाठी करावी लागते शेतात मजुरी

Next

माढा तालुक्यातील कुर्डूवाडी, टेंभुर्णी, मोडनिंब, माढा, माळशिरस तालुक्यातील अकलूज, माळशिरस, मोहोळ तालुक्यातील अनगर व मोहोळ या आठवडी बाजारात जाऊन आपली फिरस्तीपणे गुजराण करणारे छोटे कापड व्यापारी हे कुर्डूवाडी व लऊळ येथील १००, अनगर व मोहोळ येथील सुमारे १०० असे दोनशे व्यापारी सध्या आठवडी बाजार बंद असल्याने मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सर्व दुकाने चालू आहेत. मग आम्हालाच का अडथळा निर्माण होतोय, असा सवाल त्यांच्यातून विचारला जात आहे. तरी लवकरात लवकर याबाबत न्याय देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

........................

सध्या सगळे व्यवसाय सुरु झाले आहेत. आठवडी बाजारही त्वरित सुरू करावेत. फिरस्त्या छोट्या व्यापाराला रोजीरोटीसाठी दुसऱ्याच्या शेतात काम करावे लागत आहे. आमचे पोट हे या व्यवसायावरच अवलंबून आहे. तरी लवकर न्याय दयावा.

संतोष वाळूजकर, कापड व्यापारी, लऊळ

.....................

140921\2722img-20210914-wa0265.jpg

लऊळ ता माढा येथील कापड व्यापारी सगळीकडील आठवडी बाजार बंद असल्याने आपल्या शेतात काम करत असताना.

Web Title: Trade of nomadic traders closed; Wages in the field have to be done for a living

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.