सोलापुरातील व्यापाºयांनी स्पर्धेच्या युगात स्वत:ला बदलून घ्यायलाच हवं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 12:09 PM2019-12-27T12:09:10+5:302019-12-27T12:11:27+5:30

सोलापुरी प्रेझेंटेशनवर गारमेंट असोसिएशनने व्यक्त केली खंत; आंतरराष्ट्रीय गारमेंट प्रदर्शनाचे अनुभव कथन

Traders in Solapur must change themselves in the era of competition! | सोलापुरातील व्यापाºयांनी स्पर्धेच्या युगात स्वत:ला बदलून घ्यायलाच हवं !

सोलापुरातील व्यापाºयांनी स्पर्धेच्या युगात स्वत:ला बदलून घ्यायलाच हवं !

googlenewsNext
ठळक मुद्देचौथ्या आंतरराष्ट्रीय गारमेंट प्रदर्शनात योग्य प्रेझेंटेशन करायला सोलापूरचे उद्योजक कमी पडलेमुंबई, पुणे येथील गारमेंट उद्योजकांकडून उत्पादनांचे सुपर प्रेझेंटेशन तसेच मार्केटिंग झालेप्रेझेंटेशनमध्ये सोलापूरकरांची पीछेहाट झाल्याने याचा फटका भविष्यकाळात येथील गुंतवणुकीवर होणार

सोलापूर : चौथ्या आंतरराष्ट्रीय गारमेंट प्रदर्शनात योग्य प्रेझेंटेशन करायला सोलापूरचे उद्योजक कमी पडले.  याउलट मुंबई, पुणे येथील गारमेंट उद्योजकांकडून उत्पादनांचे सुपर प्रेझेंटेशन तसेच मार्केटिंग झाले.  प्रेझेंटेशनमध्ये सोलापूरकरांची पीछेहाट झाल्याने याचा फटका भविष्यकाळात येथील गुंतवणुकीवर होणार असल्याची चिंता सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाने व्यक्त केली आहे.

यापुढे नुसते चांगले उत्पादन निर्माण करून उपयोग होणार नाही, यासोबत स्पर्धेच्या युगात सोलापूरच्या गारमेंट व्यापाºयांनी स्वत:ला बदलून घ्यायलाच हवे, अशी अपेक्षा कापड उत्पादक संघाच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केली.

डिसेंबरच्या दुसºया आठवड्यात मुंबईत आंतरराष्ट्रीय गारमेंट प्रदर्शन झाले़  सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाच्या पुढाकारातून प्रदर्शन भरविले गेले़ प्रदर्शन यशस्वी झाले, परंतु म्हणावे तसे यश सोलापूरकर उद्योजकांच्या पदरी पडलेले नाही़  देश-विदेशातील बडे व्यापारी सोलापूरच्या गारमेंट स्टॉलला भेटी दिल्या़  सोलापूरचे उत्पादन व्यापाºयांच्या पसंतीसही उतरले़  पण, विदेशी व्यापाºयांच्या काही प्रश्नांना सोलापूरकर उद्योजकांनी नकारात्मक उत्तरे दिल्याने व्यापारी नाराज झालेत़  याउलट मुंबई, पुणे येथील उद्योजकांचे मार्केटिंग विदेशी व्यापाºयांच्या पसंतीस उतरले़  त्यामुळे त्यांना जादा आॅर्डर्स मिळाल्याची माहिती समोर येत आहे़  मार्केटिंग करण्यात सोलापूरकर कमनशिबी पडल्याची चर्चा प्रदर्शनानंतर सुरु झाली आहे.

याचा फटका येथील गारमेंट उद्योगाला बसणार असल्याची खंत काहींनी व्यक्त केली आहे़  सोलापूर गारमेंट उद्योग बहरत आहे़ 
 शेकडो कोटींची उलाढाल यातून होत आहे़  सोलापुरी गारमेंट उद्योगाला जागतिक मार्केट उपलब्ध व्हावे आणि यातून सोलापूरची ओळख युनिफॉर्म हब म्हणून निर्माण व्हावी, यासाठी रेडिमेड कापड उत्पादक संघाकडून अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत़  यातूनच आंतरराष्ट्रीय गारमेंट प्रदर्शनाची संकल्पना जन्मास आली.

मागील ४ वर्षांपासून प्रदर्शन भरविले जात आहे़  दोनदा सोलापूर त्यानंतर बंगळुरुमध्ये एकदा प्रदर्शन झाले़  यंदा मुंबईत प्रदर्शन झाले़  मुंबईतील प्रदर्शनातून सोलापूरकरांना खूप अपेक्षा होत्या़  प्रदर्शनात सोलापुरी स्टॉलला चांगला प्रतिसाद देखील मिळाला, परंतु गारमेंट उद्योजकांकडून काही चुका झाल्या़  स्टॉलची योग्य सजावट नव्हती़ स्टॉलवर स्पष्ट हिंदी आणि इंग्रजी बोलणारा प्रतिनिधी नव्हता़  संगणकीय प्रणालीचा वापर नव्हता़  सोलापूरच्या सोयीसुविधांबद्दल माहिती दिली गेली नाही़ आंतरराष्ट्रीय चलन स्वीकारण्यास सोलापूरकरांनी साफ नकार दिला़  त्यामुळे अनेक विदेशी व्यापारी गुंतवणूक करण्यापूर्वीच सोलापुरी स्टॉल सोडला़

एक ना अनेक नकारात्मक घटना प्रदर्शनात घडल्या
- सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाचे सहसचिव प्रकाश पवार यांनी सांगितले, सोलापूरच्या एका गारमेंट स्टॉलला सौदी येथील एका व्यापारी शिष्टमंडळाने भेट दिली़  स्कूल युनिफॉर्मची मोठी आॅर्डर त्यांच्याकडून मिळणार होती़  सौदी व्यापाºयांनी आंतरराष्ट्रीय चलन स्वीकारण्याची विनंती केली़  तर येथील उद्योजकांनी साफ नकार दिला़  त्यामुळे सौदीच्या व्यापाºयांनी गुंतवणुकीची चर्चा अर्धवट सोडून मुंबईच्या उद्योजकांशी व्यवहार सुरु केला आणि त्यांना मोठी आॅर्डरदेखील दिली़  या प्रसंगाची चर्चा संपूर्ण प्रदर्शनात सुरु होती़  या घटनेने सोलापूरची प्रतिमा खराब झाल्याची चर्चाही उद्योजकांमध्ये आहे़  अशा एक ना अनेक नकारात्मक घटना प्रदर्शनात घडल्याने यंदा प्रदर्शन जागतिक मार्केटिंगच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरले़

विमानसेवा नसल्याचाही फटका...मार्केटिंगचे प्रशिक्षण देण्याची योजना
- देश-विदेशातील व्यापारी सोलापूरच्या उद्योजकांशी व्यवहार करताना येथील दळणवळणाच्या साधनांची माहिती घेत होते़  सोलापुरात विमानसेवा आहे का असेही विचारले जात होते़  आमच्या येथे नाईटलँडिंगचे काम सुरु आहे, असे सर्वांनी सांगितले़  याचा एक नकारात्मक मेसेज प्रदर्शनात गेला़  त्यामुळे कापड उत्पादक संघाचे पदाधिकारी काहीसे निराश आहेत़  तसेच सोलापूरच्या उद्योजकांना मार्केटिंगचे धडे देण्याची गरज आहे़  त्यामुळे येत्या काळात येथील उद्योजकांना आंतरराष्ट्रीय मार्केटिंगचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती संघाच्या पदाधिकाºयांनी दिली़

Web Title: Traders in Solapur must change themselves in the era of competition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.