सोलापूरातील दोन्ही ठिकाणच्या घटनेत वाहतूक पोलीस अन् फौजदाराला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 03:30 PM2017-11-09T15:30:53+5:302017-11-09T15:31:08+5:30

वाहतुकीचे नियम तोडणाºया दुचाकीस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न करताना दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला तर राँगसाईडने जाणाºया रिक्षाचालकाला जाब विचारताना त्याने फौजदाराला बेदम मारहाण करण्याचा प्रकार आज (गुरुवारी) सकाळी ११ च्या सुमारास घडला.

Traffic Police and Faujdarara assault on the incident in both places in Solapur | सोलापूरातील दोन्ही ठिकाणच्या घटनेत वाहतूक पोलीस अन् फौजदाराला मारहाण

सोलापूरातील दोन्ही ठिकाणच्या घटनेत वाहतूक पोलीस अन् फौजदाराला मारहाण

Next


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ९ : वाहतुकीचे नियम तोडणाºया दुचाकीस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न करताना दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला तर राँगसाईडने जाणाºया रिक्षाचालकाला जाब विचारताना त्याने फौजदाराला बेदम मारहाण करण्याचा प्रकार आज (गुरुवारी) सकाळी ११ च्या सुमारास घडला. पहिली घटना डफरीन चौक तर दुसरी रंगभवन परिसरात घडली. 
त्याचे असे झाले. आज सकाळी डफरीन चौकामध्ये वाहतूक पोलीस संपत उंदा कारभळ यांची वाहतुक नियमनासाठी नियुक्ती केली होती. सकाळी ११ वाजेच्या सुमारास जुना एम्प्लायमेंट चौकातून अविनाश गायकवाड (रा. सेटलमेंट, सोलापूर) डफरीन चौकातून सिग्नल तोडून पार्क चौकाकडे निघाला होता. पोलीस कारभळ याने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. पुढे जाऊन गाडी थांबवून परत येत मानेला पकडून पोटास मारहाण केली. यात पोलिसास मुका मार लागल्याने त्यास शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. रेल्वे स्टेशन पोलीस चौकीत याची नोंद करण्यात आली आहे.
दुसरी घटना रंगभवन चौक परिसरात घडली. अशोक पोलीस चौकीला नेमणूक असलेले फौजदार दत्तात्रय विठ्ठल मोरे अरविंद धाम येथून रंगभवनमार्गे चौकीकडे जात होते. या दरम्यान, रंगभवन चौकातून न्यायालयाकडे जात असताना राँगसाईडने जाणाºया रिक्षाचालकाला विचारताना रिक्षाचालकाने तू कोण अशी विचारणा करताना मोरे यांनी आपण फौजदार असल्याची ओळख दिली. दोघात बाचाबाची झाली. रिक्षाचालकाने गाडी बाजूला लावून मोरे याच्या तोंडावर ठोसे मारुनजखमी केले. एकाचवेळी सकाळी ११ च्या दरम्यान शासकीय कामात अडथळा केला. सिव्हील पोलीस चौकीत दोन्ही घटनांच्या नोंदी झाल्या आहेत.

Web Title: Traffic Police and Faujdarara assault on the incident in both places in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.