रेल्वे प्रवाशांनो अलर्ट; लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तरच करता येणार रेल्वे प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 06:25 PM2021-12-11T18:25:27+5:302021-12-11T18:27:44+5:30

मास्क नसल्यास ५०० रुपये दंड; कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे रेल्वे प्रशासन सतर्क

Train passengers alert; Rail travel is possible only if both doses of the vaccine are taken | रेल्वे प्रवाशांनो अलर्ट; लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तरच करता येणार रेल्वे प्रवास

रेल्वे प्रवाशांनो अलर्ट; लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तरच करता येणार रेल्वे प्रवास

Next

सोलापूर : काेरोनाचा नवा स्ट्रेन ओमायक्रॉनला रोखण्यासाठी व कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन व्हावे यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध प्रकारचे निर्बंध घातले जात आहेत. लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तरच आता रेल्वे प्रवास करता येणार आहे. प्रवाशांनी रेल्वे प्रवासावेळी लसीचे दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र सोबत ठेवणे गरजेचे असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने केलेल्या कहरानंतर आता परिस्थिती नियंत्रणात आली होती व जनजीवन पूर्वपदावर येत होते. अशातच आता ओमायक्रॉन धडकला असून त्याची धास्ती सर्वत्र पसरली आहे. असे असतानाच कोरोनाला मात देण्यासाठी फक्त आणि फक्त लसीकरण हेच महत्त्वाचे शस्त्र असल्याने शासनाकडून लसीकरणावर जोर दिला जात आहे. लस घेणाऱ्यांकडून पुढील व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नसते. यामुळेच शासनाकडून लसीचे दोन्ही डोस घेणे आता बंधनकारक केले जात आहे.

----------

आरक्षित तिकीट असलेल्यांनाच रेल्वे प्रवास

कोरोनाची लस घेतल्यानंतर एक तर व्यक्तीला गंभीर संसर्ग होत नसून रुग्णालयात भरती होण्याची गरज पडत नाही. शिवाय लसीकरण झालेल्या व्यक्तीपासून संपर्कात आलेल्या व्यक्तीला लागण होत नसल्याचे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. यामुळेच आता सर्वत्र लसीकरणाचे प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे. शिवाय आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे प्रवास करता येत आहे.

---------

सध्या सुरू असलेल्या एक्स्प्रेस गाड्या...

  • सिद्धेश्वर एक्स्प्रेस
  • हुतात्मा एक्स्प्रेस
  • म्हैसूर-एलटीटी एक्स्प्रेस
  • हुसेनसागर एक्स्प्रेस
  • गदग एक्स्प्रेस
  • विशाखापट्टणम एक्स्प्रेस
  • राजकोट एक्स्प्रेस
  • कोणार्क एक्स्प्रेस

-----------

प्रमाणपत्र तपासणीसाठी पथके...

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र प्रवाशांकडे आहे की नाही, याबाबत तपासणी रेल्वे प्रवासादरम्यान करण्यात येत आहे. तिकीट तपासणी अधिकारी प्रवाशांकडे विचारणा करून प्रमाणपत्र असल्याबाबतची खातरजमा करीत आहेत. शिवाय रेल्वे प्रशासनाकडून लवकरच प्रमाणपत्र तपासणीसाठी खास पथकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगितले.

-------

रेल्वे प्रवासावेळी प्रत्येक प्रवाशाकडे लसीचे दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र सोबत असणे गरजेचे आहे. शिवाय कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन व्हावे यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रवासावेळी, तसेच स्थानकावर प्रवाशांनी मास्क घालणे बंधनकारक केले आहे.

- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, सोलापूर मंडल

Web Title: Train passengers alert; Rail travel is possible only if both doses of the vaccine are taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.