१०० गावं समृद्ध करण्यासाठी सरपंचांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:23 AM2021-04-01T04:23:31+5:302021-04-01T04:23:31+5:30

सोलापूर सोशल फाऊंडेशनने आयोजित केलेल्या समृद्ध गाव जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत आमदार देशमुख बोलत होते. या समितीच्या कामाचे विकेन्द्रीकरण ...

Training of Sarpanches to enrich 100 villages | १०० गावं समृद्ध करण्यासाठी सरपंचांना प्रशिक्षण

१०० गावं समृद्ध करण्यासाठी सरपंचांना प्रशिक्षण

Next

सोलापूर सोशल फाऊंडेशनने आयोजित केलेल्या समृद्ध गाव जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत आमदार देशमुख बोलत होते. या समितीच्या कामाचे विकेन्द्रीकरण करावे, महिला सरपंचांची समिती स्वतंत्र असावी आणि युवकांना गाव पातळीवर रोजगार मिळेल असे कार्यक्रम राबवण्यावर भर द्यावा अशा मार्गदर्शक सूचना त्यांनी केल्या.

समितीचे सदस्य असलेले फाऊंडेशनचे सल्लागार मोहन अनपट यांनी या समितीची कल्पना उपस्थित सदस्यांना समजावून दिली. उपस्थित असलेल्या सरपंचांनी तालुका स्तरावर समृद्ध गाव अभियान समित्या स्थापन कराव्यात असे आवाहन त्यांनी केेले. समितीचे सदस्य असणाऱ्या सरपंचांनी शासनाच्या योजना समजून घ्याव्यात असे आवाहन त्यांनी केले.

होटगीचे अतुल गायकवाड यांनी होटगी येथील साईबाबा मंदिराचे मार्केटिंग व्हावे तर गणेश पाटील यांनी गाव पातळीवर विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. संतोष दळवी यांनी जिल्हास्तरीय समितीला तांत्रिक मार्गदर्शन करणारी स्वतंत्र यंत्रणा असावी अशी सूचना मांडली. तसेच कोणतेही काम गावकर्‍यांच्या सहभागातून घडवावे असेही आवाहन केले.

बार्शीचे राहूल भड यानी प्रत्येक तालुक्यात पाच गावांची पथदर्शक म्हणून निवड करावी आणि त्यांचा विकास नियोजनपूर्वक करावा अशी कल्पना मांडली.

नागेश कोकरे यांनी, समितीच्या सदस्यांनी गावांना भेटी द्याव्यात आणि कोणतेही काम करताना गावकर्‍यांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य द्यावे असे मत मांडले.

या बैठकीला संचालक मयुरी वाघमारे शिवगुंडे, मुख्य समन्वयक विजय पाटील, विपुल लावंड, विजय कुचेकर, अनंता चव्हाण, सोमनिंग कमळे, हरिभाऊ यादव, सचिन सुरवसे, जालिंदर बनसोडे, चिदानंद माळगे, अशोक जाधवर, तात्या गोडगे, प्रवीण कांबळे, श्रीमंत बंडगर, शहाजी देशमुख हे उपस्थित होते.

---

Web Title: Training of Sarpanches to enrich 100 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.