सोलापूर ग्रामीण पोलिस मुख्यालयातील २२ पोलिसांच्या जिल्ह्यात बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 12:33 PM2021-02-04T12:33:08+5:302021-02-04T12:33:13+5:30

शिबिर भोवले : ग्रामीणचे सहाजण प्रतीक्षेत

Transfer of 22 policemen from Solapur Rural Police Headquarters to the district | सोलापूर ग्रामीण पोलिस मुख्यालयातील २२ पोलिसांच्या जिल्ह्यात बदल्या

सोलापूर ग्रामीण पोलिस मुख्यालयातील २२ पोलिसांच्या जिल्ह्यात बदल्या

Next

सोलापूर : जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयातील शिबिरासाठी बोलावण्यात आले होते. दोन महिन्यानंतर या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी न पाठवता जिल्ह्यातील इतरत्र असलेल्या पोलीस ठाण्यांमध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत. आणखी सहाजण शिबिरातून बाहेर पडण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जिल्ह्यातील ११ तालुक्यातील २५ पोलीस ठाण्यातून निवडलेल्या ३० कर्मचाऱ्यांना शिबिरासाठी सोलापुरातील मुख्यालयात बोलावून घेतले होते. वास्तविक पाहता हे शिबिर १४ दिवसांचे असते; मात्र शिबिराचा कालावधी ठरवण्याचा अधिकार पोलीस अधीक्षक यांना असल्याने ते कधीपर्यंत चालणार, याची उत्सुकता कर्मचाऱ्यांना लागून होती. मुख्यालयातील आणखी सहाजण बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. यातील काही कर्मचारी हे ५५ वर्षांच्या पुढील असल्याने त्यांच्या वयाचा विचार करून त्यांना पुन्हा आहे त्याठिकाणी पाठवले जाणार आहे की काय? अशी चर्चा केली जात आहे.

सुटलो बाबा एकदाचा...

- शिबिरासाठी म्हणून मुख्यालयात बोलावण्यात आल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना पुन्हा पोलीस स्टेशनला केव्हा पाठवणार, याची चिंता लागली होती. पोलीस अधीक्षकांनी २२ जणांना मूळ पोलीस स्टेशन सोडून इतरत्र बदली केल्यानंतर अनेकांनी सुटलो बाबा एकदाचा, असे म्हणत नि:श्वास टाकला.

बदल्यांचे ठिकाण....

- २२ जणांना करकंब, पांगरी, टेंभूर्णी, मोहोळ, पंढरपूर, पंढरपूर ग्रामीण, सांगोला, अक्कलकोट दक्षिण, सोलापूर तालुका पोलीस स्टेशन, मंद्रुप, कामती, बार्शी, मंगळवेढा याठिकाणी बदली करण्यात आली आहे.

Web Title: Transfer of 22 policemen from Solapur Rural Police Headquarters to the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.