सोलापूर ग्रामीण पेालिस दलातील २९ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अधीक्षकांचे आदेश
By Appasaheb.patil | Published: March 5, 2023 01:16 PM2023-03-05T13:16:58+5:302023-03-05T13:17:49+5:30
तात्काळ रूजू होऊन अहवाल पाठविण्याच्या सुचना
सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील २९ सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या २९ अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच करण्यात आल्या. याबाबतचा आदेश पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी काढले.
सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव मारकड यांची अकलूजहून करमाळ्याला, अदिनाथ खरात : पंढरपूर तालुका ते सांगोला पोलिस ठाणे, शशिकांत शेळके : माळशिरसहून स्थानिक गुन्हे शाखा, आशितोष चव्हाण : माेहोळहून सांगोला, प्रकाश भुजबळ : करमाळाहून मंगळवेढा, प्रशांत हुले : सांगोल्याहून टेंभुर्णी, शंकरराव ओलेकर : पंढरपूर तालुकाहून मोहोळ, अमोल बामणे : मंगळवेढ्याहून वैराग, नागेश यमगर : सांगोल्याहून मोहोळ, सत्यजीत आवटे : मंगळवेढ्याहून वैराग, राजकुमार डुणगे : मोहोळहून पंढरपूर तालुका, बाळासाहेब माने : सांगोल्याहून पंढरपूर तालुका, नेताजी बंडगर : सोलापूर तालुका येथून करमाळा, सचिन जगताप : करमाळ्याहून सांगोला, पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे : माढ्याहून कुर्डूवाडी, महेश मुंढे : करकंबहून पंढरपूर शहर, आकाश भिंगारदेव : पंढरपूर शहरहून करकंब, हनुमंत वाघमारे : कुर्डूवाडीहून टेंभुर्णी, प्रविण साने : करमाळाहून बार्शी शहर, सारीका शिंदे : अकलूजहून पंढरपूर शहर, मनिषा महाडिक : पंढरपूर शहरहून अकलूज, महिबुब शेख : वाचक, करमाळाहून माेहोळ, पोपट काशीद : टेंभुर्णीहून सांगोला, संदेश नाळे : सांगोल्याहून कुर्डूवाडी, धनाजी खापरे : मोहोळहून स्थानिक गुन्हे शाखा, गजानन कर्णेवाढ : बार्शी शहरहून करमाळा, अजित मोरे : करकंबहून अक्कलकोट उत्तर, सुखदेव गोदे : पंढरपूर ग्रामीणहून कामती तर दिलीप सलबत्ते यांची मंद्रुपहुन वाचक शाखा, सोलापूर येथे बदली करण्यात आली आहे.
येणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची वाट पाहू नये..
संबंधित प्रभारी अधिकारी यांनी या बदली आदेशाची प्रत संबंधित पोलीस अधिकारी यांना तात्काळ बजावून त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे, बदली झालेल्या पेालीस अधिकारी यांना कार्यमुक्त करताना पर्यायी, बदलीवर येणाऱ्या पोलीस अधिकारी यांची वाट पाहू नये, बदली झालेल्या संबंधित पोलीस अधिकारी यांनी त्यांच्या बदलीठिकाणी तात्काळ हजर होवून पुर्तता अहवाल ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयास सादर करावा असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.