सांगोल्याच्या तालुका आरोग्याधिकाऱ्यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:23 AM2021-05-13T04:23:06+5:302021-05-13T04:23:06+5:30
डॉ. सीमा दोडमनी यांनी गेल्या तीन वर्षांपूर्वी सांगोला तालुका आरोग्य अधिकारी म्हणून पदभार घेतला तेव्हापासून त्या मुख्यालयात राहत नव्हत्या. ...
डॉ. सीमा दोडमनी यांनी गेल्या तीन वर्षांपूर्वी सांगोला तालुका आरोग्य अधिकारी म्हणून पदभार घेतला तेव्हापासून त्या मुख्यालयात राहत नव्हत्या. त्यांच्याविषयी सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्य यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अकोला तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना दुसऱ्या लाटेचा वेगाने प्रसार होत असताना प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या ठिकाणी कोविड लसीकरणाचे नियोजन करणे, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून नियोजन करणे गरजेचे होते, तर मागील आठवड्यात या कामावरच नसल्याचे निदर्शनास आले आहे. डॉ. सीमा दोडमनी यांच्याकडे या कार्यालयाकडील अतिरिक्त कामकाज सोपविण्यात आल्याने कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने डॉ. संदीप देवकाते वैद्यकीय अधिकारी यांच्याकडील मूळ पदभार संभाळून तालुका आरोग्य अधिकारी येथील दैनंदिन कामकाज पाहणार आहेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी सांगितले.