सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली; दत्तात्रय कराळे नवे पोलीस आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 08:55 AM2021-08-24T08:55:08+5:302021-08-24T08:55:51+5:30

सोलापूर : सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त शिंदे यांची पदोन्नतीवर सुधार अंकुश सेवा मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली ...

Transfer of Solapur Police Commissioner Ankush Shinde; Dattatraya Karale new police commissioner | सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली; दत्तात्रय कराळे नवे पोलीस आयुक्त

सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली; दत्तात्रय कराळे नवे पोलीस आयुक्त

googlenewsNext

सोलापूर : सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त शिंदे यांची पदोन्नतीवर सुधार अंकुश सेवा मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे. सोलापूरच्या पोलीस आयुक्तपदी सध्या ठाणे शहर पूर्व विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे हे पदोन्नतीवर येत आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने सोमवारी राज्यातील २३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नीवर बदल्याकेल्या आहेत. बदल्यांमध्ये पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली झाली आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दि. ३१ मे २०१९ रोजी तत्कालीन पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्याकडून पदभार स्वीकारला होता.

पदभार घेतल्यानंतर त्यांनी सोलापूरला अभिमान वाटेल असे काम करू असे अश्वासन दिले होते. त्यानुसार गेल्या दोन वर्षे तीन महिन्यांच्या कालावधीत अंकुश शिंदे यांनी शहरातील गुन्हेगारी मोडून काढली. शहरातील सावकारी, अवैध धंदे यावर चांगलाच अंकुश निर्माण केला होता. पोलीस खात्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्येही शिस्त लावली होती.

Web Title: Transfer of Solapur Police Commissioner Ankush Shinde; Dattatraya Karale new police commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.