शिक्षकांच्या बदली अर्जाचा पोर्टल खुलेना, शिक्षक संघाने मागितली मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 02:40 PM2017-10-24T14:40:13+5:302017-10-24T14:40:20+5:30

सोलापूर दि २४ : बदली अर्ज भरण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांनी इंटरनेट कॅफेवर गर्दी केली़ मात्र सर्व्हर डाऊन असल्याने पोर्टल काही केल्या ओपन होईना़

Transfer of teachers to open application portal, extension requested by teachers team | शिक्षकांच्या बदली अर्जाचा पोर्टल खुलेना, शिक्षक संघाने मागितली मुदतवाढ

शिक्षकांच्या बदली अर्जाचा पोर्टल खुलेना, शिक्षक संघाने मागितली मुदतवाढ

googlenewsNext


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २४ : बदली अर्ज भरण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांनी इंटरनेट कॅफेवर गर्दी केली़ मात्र सर्व्हर डाऊन असल्याने पोर्टल काही केल्या ओपन होईना़ अखेर सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ आणि समितीच्या पदाधिकाºयांनी शिक्षणाधिकारी संजय राठोड यांची भेट घेऊन आॅनलाईन बदली अर्ज भरण्याला मुदतवाढ मागितली़ 
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात उच्च न्यायालयाने १४ सप्टेंबरच्या जीआरला स्थगिती दिली गेली़ त्याच दिवशी ग्रामविकास मंत्रालयाने २७ फेब्रुवारीच्या जीआरनुसार बदलीपात्र शिक्षकांना आॅनलाईन अर्ज भरण्याचे फर्मान काढले़ १३ ते २३ सप्टेंबर काळात बदलीचा पोर्टल आॅनलाईन उपलब्ध करुन दिल्याचे जाहीर केले़ पण प्रत्यक्षात या काळात ही सेवा सुरळीपणे मिळालीच नाही़ १३ तारखेनंतर पाच-सहा दिवस मागावयाच्या शाळांची नावेच या पोर्टलवर दिसत नव्हती़ त्यानंतर एक-दोन दिवस ही नावे दिसली़ या काळात काही शिक्षकांनी आॅनलाईन अर्ज भरलाही़ परंतु व्हेरीफाई  करण्याची सुविधा उपलब्ध झाली नाही़ त्यामुळे आॅनलाईन अर्ज भरुनही न भरल्यासारखे झाले़ तसेच आजपर्यंत पोर्टलही बंदच राहिला़ रविवारी रात्री ९ वाजता व्हॉट्सअ‍ॅपवर सर्व्हर सुरु होत असल्याची पोस्ट पडली आणि बºयाच शिक्षकांनी इंटरनेट कॅफेवर गर्दी केली़ त्यांची झोप उडाली़ परंतु पुन्हा पहिलाच पाढा़ सोमवारी याची मुदत संपणार असल्याने या शिक्षकांच्या पदरी घोर निराशा पडली़ 
संतप्त शिक्षकांनी शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवानंद भरले, शिक्षक समितीचे अध्यक्ष अंकुश काळे, शिक्षक संघाचे अध्यक्ष मच्ंिछद्र मोरे, अक्कलकोट संघाचे अध्यक्ष वीरभद्र यादवाड आणि दक्षिण शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत हत्तुरे-डोगे यांना घेऊन शिक्षणाधिकारी संजय राठोड यांची भेट घेतली आणि आॅनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ मागितली़ 

Web Title: Transfer of teachers to open application portal, extension requested by teachers team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.