Gram Panchayat Election: सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये सत्ता परिवर्तन; भाजपाला दणका, प्रकाश पाटील यांचा विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 13:29 IST2022-12-20T13:28:32+5:302022-12-20T13:29:29+5:30
सरपंचपदासह 13 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.

Gram Panchayat Election: सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये सत्ता परिवर्तन; भाजपाला दणका, प्रकाश पाटील यांचा विजय
पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या तुंगत ग्रामपंचायती मध्ये सत्ता परिवर्तन झाले असून येथे काँग्रेसचे नेते प्रकाश पाटील यांच्या गटाने सत्ता मिळवली आहे. सरपंचपदासह 13 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपाचे माजी आमदार प्रशांत परिचारक गटाचा सुपडासाफ झाला आहे.
डॉ अमृता रणदिवे या सरपंचपदी निवडून आल्या आहेत. पंचायतीच्या निवडणूक निकालाकडे संपूर्ण पंढरपूर तालुक्याचे लक्ष लागले होते. तालुक्यातील 11 ग्रामपंचायत पैकी 6 ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीची सत्ता आली तर तुंगत मध्ये काॅग्रेसचे नेते प्रकास पाटील या यांची सत्ता आली आहे.