अकलूज आगाराने गुंडाळला दगडफे कीमुळे परिवहन दिन

By admin | Published: June 2, 2014 12:42 AM2014-06-02T00:42:26+5:302014-06-02T00:42:26+5:30

अकलूजमध्ये बंद: नुकसान टाळण्यासाठी खबरदारीचे उपाय

Transport day due to unauthorized construction of stones | अकलूज आगाराने गुंडाळला दगडफे कीमुळे परिवहन दिन

अकलूज आगाराने गुंडाळला दगडफे कीमुळे परिवहन दिन

Next

अकलूज : अकलूज आगाराच्या वतीने परिवहन दिन साजरा होत असतानाच छ. शिवाजी महाराज, संभाजी महाराज व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून विटंबना झाल्याने अज्ञातांनी अकलूज आगाराच्या दोन गाड्या व पंढरपूर आगाराच्या एका गाडीवर दगडफे क केल्याने परिवहन दिन गुंडाळून ठेवत अकलूज आगारातून सर्वच मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. तर अकलूज शहरात बंद पाळण्यात आला. परिवहन महामंडळाच्या वर्धापनदिनी मंडळातील सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या आनंदात एकमेकांना शुभेच्छा देत असतानाच समाजकंटकांनी केलेल्या दगडफे कीमुळे आनंदाचे वातावरण एकदम तणावग्रस्त बनले. पंढरपूर, कुर्डूवाडी व इतर शहरांमधील दगडफे कीच्या व बंदच्या बातम्या जसजशा येऊन धडकायला सुरू झाल्या तसतसा प्रवाशांच्या चेहर्‍यावर चिंतेचे भाव दिसू लागले. बस गाड्यांचे होणारे नुकसान पाहून अकलूज आगाराने सकाळी ११ वाजल्यापासून सर्वच मार्गांवरची वाहतूक बंद ठेवली. त्यामुळे अकलूज बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती. शहरातील सर्वच व्यवहार बंद असल्याने बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांचे खाण्यापिण्याचे प्रचंड हाल झाले. दिवसभराची वाहतूक बंद ठेवल्यामुळे सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान होणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक पी. डी. वाघमोडे व स्थानक प्रमुख आर. टी. वाघमारे यांनी दिली. रविवार सकाळपासूनच अकलूज शहरातील वातावरण तणावग्रस्त बनले होते. सर्व व्यापार्‍यांनी आपले व्यवहार बंद ठेवून झाल्या घटनेचा निषेध नोंदविला. माळशिरस तालुका शिवसेनेच्या वतीने आज अकलूज बंद पुकारण्यात आला. यावेळी पोलीस उपअधीक्षक संजयकुमार पाटील यांना माळशिरस तालुका शिवसेना प्रमुख नामदेव वाघमारे, युवासेना जिल्हाधिकारी स्वप्निल वाघमारे, दत्ताआबा पवार व कार्यकर्त्यांकडून निवेदन देऊन सदर घटनेचा निषेध करण्यात आला. शहरातील इतर शिवप्रेमी संघटनांनीही आपापल्या पद्धतीने झाल्या घटनेचा जाहीर निषेध करून दोषी व्यक्तीला कठोर सजा देण्याची मागणी केली आहे.

---------------------

दगडफेक करणारे जेरबंद

पोलिसांनी संवेदनशील भागांमध्ये मोठा बंदोबस्त लावला होता. पंढरपूर आगाराच्या बसवरती दगडफेक करणार्‍या अज्ञात व्यक्तींच्या दोन चाकी गाडीचा नंबर वाहकाने टिपून ठेवला होता. पोलिसांना हा गाडीचा नंबर मिळताच सदर इसमांचा तातडीने शोध घेण्याचे काम सुरू झाले होते. दगडफेक करणार्‍या ५ संशयीतांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पोलीस उपअधीक्षक संजयकुमार पाटील यांनी नागरिकांना शांतता व सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे. -

 

Web Title: Transport day due to unauthorized construction of stones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.