परिवहन खात्याला वर्षाला ३० कोटी तोटा

By Admin | Published: May 23, 2014 12:54 AM2014-05-23T00:54:33+5:302014-05-23T00:54:33+5:30

परिवहन समिती सभा: ११७ कोटींचे अंदाजपत्रक एकमताने मंजूर

Transport Department gets 30 million losses annually | परिवहन खात्याला वर्षाला ३० कोटी तोटा

परिवहन खात्याला वर्षाला ३० कोटी तोटा

googlenewsNext

सोलापूर: मनपा परिवहन खात्याचे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षाचे ११७ कोटी ८० लाख ६७ हजारांचे अंदाजपत्रक परिवहन समितीने एकमताने मंजूर केले़ या अंदाजपत्रकाला मनपा सभेत अंतिम मंजुरी मिळणार आहे़ वार्षिक उत्पन्न ४२ कोटी तर खर्च ७२ कोटी असणार्‍या परिवहन खात्याला वर्षाकाठी ‘३० कोटींचा तोटा’ होणार असल्याचे अंदाजपत्रकात नमूद केले आहे़ महापालिकेच्या परिवहन समितीची बैठक गुरुवारी सायंकाळी स्थायी समिती सभागृहात सभापती आनंद मुस्तारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ यावेळी अंदाजपत्रकास एकमताने मंजुरी देण्यात आली़ परिवहन समिती सभापतीला नवी गाडी घेण्यासाठी ७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे़ ७५० कर्मचारी असलेल्या मनपा परिवहन खात्याचा डोलारा आता वाढू लागला आहे़ नव्या १० व्हॉल्व्हो बस धावू लागल्या आहेत; मात्र अद्याप २०० पैकी १९० बस येणे बाकी आहे़ त्या बस आल्यानंतर किती फायदा - किती तोटा हे गणित मांडले जाणार असले तरी परिवहन समितीने व्यक्त केलेल्या अंदाजपत्रकात वर्षाकाठी ३० कोटी रुपये तोटा गृहीत धरला आहे़ महापालिकेने परिवहन खात्याला गतवर्षी ११ कोटींचे अनुदान दिले होते, त्यामुळे चालू वर्षात अंदाजे होणारा ३० कोटींचा तोटा मनपाने अनुदान स्वरुपाने द्यावा, अशी मागणी बजेटमध्ये करण्यात आली आहे़ सध्या परिवहन खात्याच्या ७० बस रस्त्यावर धावत असून दैनंदिन ४ लाखांचे उत्पन्न मिळत आहे़ परिवहन व्यवस्थापकांनी ११४ कोटी ३१ लाखांचे अंदाजपत्रक समितीला सादर केले होते, यामध्ये परिवहन समितीने ३़४९ कोटींची वाढ करुन ११७ कोटी ८० लाख ६७ हजारांचे अंदाजपत्रक अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविले आहे़ यामध्ये बस भाड्यातून ३५ कोटी उत्पन्न ग्राह्य धरले आहे़ मुलींना मोफत बस सुविधा देण्यासाठी मनपाकडून २ कोटींचे अनुदान ग्राह्य धरले आहे़ नागरिक पासेस व विद्यार्थी पासेस यांच्या माध्यमातून वर्षातून ३ कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे़ बसशेड आणि बसवरील जाहिरातींच्या माध्यमातून ५० लाख तर जुन्या बसच्या स्क्रॅप मालातून ६० लाखांचे उत्पन्न जमेच्या बाजूला दाखविले आहे़

--------------------- ४० किमीसाठी पाठपुरावा मनपा परिवहन बससाठी सध्या मनपा हद्दीपासून १५ किलोमीटरची हद्द आहे, ती आता ४० किलोमीटर करण्याची शिफारस अंदाजपत्रकात केली आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, असे सुचविले आहे़ विडी कामगारांच्या मुलांना मोफत बस प्रवास देण्यासाठी मनपाने अनुदान द्यावे, अशी सूचना केली आहे़ सात रस्ता, राजेंद्र चौक, बुधवार पेठ येथे असणारे डेपो विकसित करण्याची शिफारसदेखील अंदाजपत्रकात केली आहे़

-------------------------------

बजेटमधील ठळक बाबी परिवहन समिती सभापतीच्या गाडीसाठी ७ लाख वर्षाकाठी कर्मचार्‍यांच्या वेतनावर खर्च ९़६० कोटी परिवहनवरील कर्ज आणि देणी- २७़९७ कोटी मिळणारे वार्षिक उत्पन्न- ४२़३५ कोटी होणारा वार्षिक खर्च- ७२़३० कोटी डिझेलवर वर्षाकाठी खर्च- २० कोटी तोटा महापालिकेने अनुदान रुपाने भरुन काढावा

Web Title: Transport Department gets 30 million losses annually

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.