रस्त्यांच्या दुरुस्तीनंतर दळणवळण होईल सुकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:40 AM2021-03-13T04:40:22+5:302021-03-13T04:40:22+5:30
तसेच तालुक्यातील रस्त्यांबरोबरच शहरात सध्या अस्तित्वात असलेल्या विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे स्वामी भक्तांची गैरसोय होत होती. तीर्थक्षेत्र अक्कलकोट ...
तसेच तालुक्यातील रस्त्यांबरोबरच शहरात सध्या अस्तित्वात असलेल्या विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे स्वामी भक्तांची गैरसोय होत होती. तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरात येणाऱ्या स्वामी भक्तांना सुसज्ज असे शासकीय विश्रामगृह नाही. यामुळे राज्यातून येणाऱ्या स्वामीभक्तांसाठी नव्याने आधुनिक सोयीसुविधांचा समावेश असलेले विश्रामगृह होणे आवश्यक होते. त्यासाठीही निधी मंजूर झाल्याची माहिती आ. कल्याणशेट्टी यांनी दिली.
अर्थसंकल्पात सुलेरजवळगे ते केगाव व मुंढेवाडी मार्गे अंकलगे, अंकलगे ते आळगे व शेगांव मार्गे मुंढेवाडी रस्ता प्रत्येकी १ कोटी ५० लाख रुपये, वळसंग ते तीर्थ मार्गे चपळगाव रस्ता १ कोटी २० लाख रुपये, अक्कलकोट स्टेशन ते शावळमार्गे हिळळी रस्ता १ कोटी ५० लाख रुपये, साफळे ते बादोले मार्गे घोसळगाव रस्ता क्रमांक १ कोटी २५ लाख रुपये, चपळगाव ते बऱ्हाणपूर व डोंबरजवळगे मार्गे दर्शनाळ १ कोटी २५ लाख रुपये तसेच अक्कलकोट येथील व्हीआयपी शासकीय विश्रामगृहासाठी २ कोटी २० लाख रुपये असे एकूण १० कोटी ४० लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार कल्याणशेट्टी यांनी दिली.