प्रवासी म्हणतात, धुळीमुळे जीव गुदमरतोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:40 AM2021-02-06T04:40:52+5:302021-02-06T04:40:52+5:30
या महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु सोलापूर-मंगळवेढा या रस्त्यावर ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यामुळे धूळ उडत आहे. ...
या महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु सोलापूर-मंगळवेढा या रस्त्यावर ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यामुळे धूळ उडत आहे. या धुळीचा प्रवाशांसह चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. ठिकठिकाणी चौकातील हॉटेलमालकांना, गावातील नागरिकांनाही या धुळीचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे श्वसनाच्या तक्रारी वाढल्या आहेत. खोदकाम केलेल्या ठिकाणी वेळोवेळी पाणी मारावे, अशी मागणी प्रवाशांसह नागरिकांमधून होत आहे.
कोट ::::::::::::
आम्ही कर्मचाऱ्यांना खोदकाम केलेल्या भागावर वारंवार पाणी मारण्यास सांगत असतो. रस्त्याचे काम युद्धपातळीवर होत असून लवकरात लवकर हा महामार्ग आपल्या सेवेत येईल. सध्या होणाऱ्या गैरसोईबाबत आम्ही पर्याय सूचवत आहोत. येणाऱ्या काळात धुळीचे प्रमाण कमी होईल.
- अभिषेक दुबे,
जनसंपर्क अधिकारी, डीबीएल कंपनी
फोटो
०५कामती०१
ओळी
चारचाकी वाहने जाताच अशा पद्धतीने धूळ उडून दुचाकीस्वारांना त्रास होत आहे.