वारी निघाली लंडनला...!! २२ देशातून १८ हजार किमी प्रवास; पंढरपूर ते लंडन दिंडीचे प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 10:04 IST2025-04-15T10:03:09+5:302025-04-15T10:04:22+5:30

१४ एप्रिल ते २१ जून या कालावधीत पादुका दिंडीचे परदेशातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या भक्तांना दर्शन 

Traveling 18 thousand km through 22 countries; Departure from Pandharpur to London Vitthal Rukimini Paduka Dindi | वारी निघाली लंडनला...!! २२ देशातून १८ हजार किमी प्रवास; पंढरपूर ते लंडन दिंडीचे प्रस्थान

वारी निघाली लंडनला...!! २२ देशातून १८ हजार किमी प्रवास; पंढरपूर ते लंडन दिंडीचे प्रस्थान

पंढरपूर - महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असलेले पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि वारीची, संत परंपरेची गाथा आता जगभरात पोहचणार आहे. काही वर्षात यूके म्हणजे लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर श्री विठ्ठलभक्त अनिल खेडकर साकारणार आहेत. १४ एप्रिल रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथून दिंडी लंडनकडे मार्गस्थ झाली आहे.

श्री विठ्ठल भक्त अनिल खेडकर मूळचे अहिल्यानगर येथील असून ते सध्या लंडन, युके येथे स्थायिक आहेत. ते लंडनमध्ये विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर साकारणार आहेत. त्यानिमित्त सोमवारी पादुकासह दिडी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आल्यानंतर त्यांच्याकडील पादुकांचे मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी मंदिर समितीच्या सदस्य शंकुतला नडगिरे, हभप ज्ञानेश्वर महाराज देशमुख जळगावकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, अनिल खेडकर उपस्थित होते. 

याबाबत माहिती देताना अनिल खेडकर म्हणाले की, मी गेल्या ७ वर्षापासून आळंदी ते पंढरपूर पायी वारी करत आहे. अमेरिका, युरोप, लंडन येथे अनेक भारतीय मंदिरे आहेत. इस्कॉन, अक्षरधाम तसेच राजस्थान येथील देवतांची मंदिरे परदेशात आहेत. पण एवढी जुनी संत साहित्य परंपरा असलेले पंढरपूर येथील मंदिर नाही. यासाठी वारी सातासमुद्रापार नेण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. पुढील ७० दिवसांत १८ हजार किमी एवढा प्रवास करत कारने या पादुका घेऊन जाणार आहे. १८ एप्रिल रोजी भारत सोडून नेपाळ, चीन, रशिया, जर्मनीसह २२ देशांतून ही दिंडी जाणार आहे.

दिंडीतील पादुका कारमधून लंडनला जाणार

वारीतील प्रेम, जिव्हाळा, सलोखा परदेशातील भक्तांना अनुभवता यावा यासाठी पादुका दिंडी परदेशात पाठवली जात आहे. दिंडीतील पादुका विमानाने लंडनला जाऊ शकतात पण समर्पण म्हणून सुखी संसाराची वाट सोडून लाखो भाविक पायी वारी करतात यासाठी पादुका दिंडी कारमधून लंडनकडे जाणार आहे. सर्व देशांचा व्हिसा, वाहनांचे परमिट, इतर कायदेशीर तयारी त्यांनी केली असल्याची माहिती व्यवस्थापक श्रोत्री यांनी दिली. 

Web Title: Traveling 18 thousand km through 22 countries; Departure from Pandharpur to London Vitthal Rukimini Paduka Dindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.