'आमदार हनुमंत डोळस यांच्यावर उपचार सुरू, कृपया अफवा पसरवू नका'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 21:04 IST2019-04-29T21:04:07+5:302019-04-29T21:04:51+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2014 साली हुनमंत डोळस यांना उमेदवारी देण्यात आली होती.

'आमदार हनुमंत डोळस यांच्यावर उपचार सुरू, कृपया अफवा पसरवू नका'
मुंबई/सोलापूर - माळशिरस तालुक्याचे आमदार हुनमंत डोळस यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. मुंबईतील सैफी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या खोट्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन डोळस यांचे चिरंजीव संकल्प डोळस यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2014 साली हुनमंत डोळस यांना उमेदवारी देण्यात आली होती. माळशिरस हा मतदारसंघ राखीव असून त्या मतदारसंघातून ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजयी झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईच्या चर्नी रोड परिसरातील सैफी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयाचे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असून कृपया काहीही अफवा पसरवू नका, अशी विनंती त्यांचे चिरंजीव संकल्प डोळस यांनी केली आहे. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या माळशिरस मतदारसंघातून आमदार डोळस हे 2009 आणि 2014 मध्ये आमदार झाले आहेत.