अक्कलकोट येथे नवीन रुग्णालयात दहा कोरोना रुग्णांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:23 AM2021-04-27T04:23:27+5:302021-04-27T04:23:27+5:30
रविवारी सकाळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते अक्कलकोट-मैंदर्गी रोडवरील स्वामी समर्थ देवस्थानच्या रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या कोरोना ...
रविवारी सकाळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते अक्कलकोट-मैंदर्गी रोडवरील स्वामी समर्थ देवस्थानच्या रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या कोरोना हेल्थ सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. त्याच दिवशी दिवसभरात पाच रुग्ण दाखल झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवसी दुपारपर्यंत ५ असे दहा रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. त्यापैकी तीन रुग्णांना येथे उपचार करण्यात काही अडचणी होत्या म्हणून सोलापूर येथे पाठविण्यात आले आहे. उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहे.
सोमवारी दुपारी आमदार कल्यांणशेट्टी यांनी नव्याने सुरू झालेल्या रुग्णालयात भेट देऊन रुग्णांचे विचारपूस केली आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल क्षीरसागर यांच्याकडून अडचणी जाणून घेतल्या. यामुळे रुग्ण व उपचार करणारे वैद्यकीय टीमला आधार मिळाला आहे.
---
नव्याने सुरू करण्यात आलेल्या कोरोना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रुग्ण येत आहेत. सध्या ऑक्सिजनचे उपचार सुरू आहे. रेमडेसिविर इंजेक्शन लवकरच मिळतील. जास्तीत जास्त रुग्ण याठिकाणी बरे करण्याचा आमचे प्रयत्न राहणार आहे.
- डॉ.अशोक राठोड, वैद्यकीय अधीक्षक
----
सदरचे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी फार मोठी प्रयत्न करावे लागले. यामुळे अनेक गोरगरिबांची सोय होत आहे. सध्या ऑक्सिजनसह अनेक प्रकारचे सुविधा उपलब्ध आहे. उर्वरित गरजाही लवकरच उपलब्ध करून देऊ.
- आमदार सचिन कल्यांणशेट्टी
२६अक्कलकोट-कोविड सेंटर
अक्कलकोट येथील कोरोना रुग्णालयात रुग्णांचे विचारपूस करून अडीअडचणी जाणून घेताना आमदार सचिन कल्यांणशेट्टी, यांना महिती देताना डॉ. निखिल क्षीरसागर दिसत आहेत