जिथे सुविधा तेथे उपचार.. कोणाचाही आक्षेप नको, अन्यथा हॉस्पिटलवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:21 AM2021-04-25T04:21:46+5:302021-04-25T04:21:46+5:30

कुर्डूवाडीत पंचायत समिती सभागृहात कोरोनाविषयी अधिकाऱ्यांची व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी साडेबारा वाजता ...

Treatment where facilities are available | जिथे सुविधा तेथे उपचार.. कोणाचाही आक्षेप नको, अन्यथा हॉस्पिटलवर कारवाई

जिथे सुविधा तेथे उपचार.. कोणाचाही आक्षेप नको, अन्यथा हॉस्पिटलवर कारवाई

Next

कुर्डूवाडीत पंचायत समिती सभागृहात कोरोनाविषयी अधिकाऱ्यांची व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी साडेबारा वाजता घेतली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, सभापती विक्रमसिंह शिंदे, जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, माजी उपसभापती बंडू ढवळे, नगराध्यक्ष समीर मुलाणी, माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपविभागीय अधिकारी जोती कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, शिवसेनेचे नेते संजय कोकाटे, जिल्हा लस टोचणी अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, उपअभियंता एस. जे. नाईकवाडी, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल शिंदे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनंदा गायकवाड, मुख्याधिकारी समीर भूमकर, गटशिक्षणाधिकारी मारुती फडके, प्रशासन अधिकारी सयाजी बागल, बांधकामचे अधीक्षक महेश शेंडे, मार्केट कमिटीचे संचालक बंडू भोसले, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

---

हातावरचे पोट असलेल्यांना मदत करा

दरम्यान, येथील जीवनरक्षा समिती, नाभिक संघटना याबरोबरच अनेक संघटनांनी कोरोनाबाबत कडक उपाययोजना व्यवस्थित करण्यात याव्यात व लॉकडाऊनमध्ये ज्याचे हातावरचे पोट आहे. त्यांना मदत करावी अशी मागणी केली. त्यावर सकारात्मक विचार करीत पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात कोठेही कशाचीही कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही दिली.

----

कुर्डूवाडीत मोठे कोविड सेंटर हवे

बैठकीत शिवसेनेचे संजय कोकोटे यांनी रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याची तक्रार केली, तर काही जणांनी कुर्डूवाडीत मोठे कोविड सेंटर तातडीने निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीही मागणी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद पालकमंत्री भरणे यांनी दिला.

२४कुर्डूवाडी-पालकमंत्री

कुर्डूवाडी येथील कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना माढा तालुक्यातील स्थितीची माहिती देताना गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जि. प. सदस्य रणजित शिंदे, उपविभागीय अधिकारी जोती कदम, नगराध्यक्ष समीर मुलाणी, माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे आदी.

----

Web Title: Treatment where facilities are available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.